डाॅ.वर्षा राठोड यांच्या उमेदवारीसाठीबंजारा समाजाचे शरद पवारांना निवेदन——————————————वाशीम—————कारंजा—मानोरा विधानसभा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत उमेदवार डाॅ.वर्षा राठोड (जैन) यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पोहरादेवी येथील महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यानी लोकनेते खासदार शरद पवार यांचेकडे केली आहे.मागील २५ वर्षापासून वाशीम जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही.२०२४ मध्ये होणा—या विधानसभा निवडणूकीत कारंजा—मानोरा मतदार संघातून बंजारा समाजाच्या स्थानिक आणि उच्चशिक्षीत असलेल्या एकमेव महिला उमेदवार डाॅ.वर्षा राठोड यांनाच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी द्यावी, अशी मागणी बंजारा समाजाची काशी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत रमेश महाराज व त्यांच्या सहका—यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून केली आहे.त्या अनुषंगाने आँक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहरादेवी येथे खासदार शरद पवारांची सभा होणार असून या सभेत अनेक मान्यवर मंडळी,महाराज मंडळी व शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.——————————————