पंतप्रधान मोदींशी तांडा संपर्क अभियानच्या महिला पदाधिकाऱ्याने साधला संवाद
हिवरा खुर्द च्या सौ.राठोड यांनी समाज बांधवांच्या वतीने मानले सरकारचे आभार
मानोरा — (साप्ता. दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)तालुक्यातील हिवरा खुर्द निवासी तांडा संपर्क अभियान प्रदेश सहसंयोजिका जयश्री दुलसिंग राठोड यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेले देशाचे पंतप्रधान ना.नरेंद्र मोदी यांच्याशी थोडक्यात संवाद साधला.
राज्यातील जळगाव शहरात देशभरातील महिलांसाठी लखपती दीदी या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा मेळावा देशाच्या पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि केंद्र व राज्य सरकारातील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी तथा देशभरातील असंख्य महिला (दीदी) उपस्थित होत्या. राज्यातील मूळ निवासी असलेल्या १८ ते ५० वर्षे वय असणाऱ्या बचत गटातील महिलांना एक ते पाच लक्ष रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज स्वयंरोजगारासाठी लखपती दीदी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
राज्यामध्ये निवासाला असलेल्या बंजारा व विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उत्थाण होण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विविध उपक्रमांबाब महाराष्ट्र प्रदेश तांडा संपर्क अभियानाच्या सहसंयोजिका सौ.जयश्री राठोड यांच्या कडून समाजाच्या वतीने मा.पंतप्रधानांचे आभार व्यक्त करण्यात आले.
पंतप्रधान ना.मोदी यांच्याशी भेटीची संधी मिळवून दिल्याबद्दल रामेश्वर नाईक,निलेश जाधव आणि एस.पी.रेड्डी यांचा समाजाच्या वतीने सौ.राठोड यांनी आभार व्यक्त केले.