पोहरादेवी येथून तांडा वस्ती संपर्कअभियानाची सुरुवात. मानोरा-बंजारा समाजाची काशी असलेल्या बंजारा समाजाचे आराध्य दैवत सद्गुरू श्री संत सेवालाल महाराज यांची पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी ता.मानोरा जिल्हा वाशिम येथे तांडा वस्ती संपर्क अभियानाची बैठक आज दिनांक 9 मार्च 2024 रोजी शनिवारी सकाळी 11 ते 4 वाजे पर्यंत बैठकीचे आयोजन विदर्भ तांडा वस्ती संपर्क अभियान यांच्या कडुन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब बैठकिला आँनलाईन उपस्थित राहून प्रदेश संयोजक, विदर्भ संयोजक, जिल्हा संयोजक व सह संयोजक यांना मार्गदर्शन केले. “तांड्यावरची होळी” हा बंजारा समाजाचा सन समाजाच्या पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करावा असे आवाहन पदाधिकार्यांना केले. प्रदेश संयोजक तांडा वस्ती संपर्क अभियान डॉ मोहन चव्हाण साहेब व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मंत्रालय उपसचिव श्री अमोल पाटनकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा कार्यक्रम पवित्रभुमी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे पार पडला. या विदर्भ स्तरीय तांडा वस्ती संपर्क अभियान बैठकीला प्रदेश पदाधिकारी, सर्व विभागाचे संयोजक,सह संयोजक तसेच विदर्भातील विभागीय संयोजक, जिल्हा व
*यावेळी विदर्भ संयोजक सदाशिव भाऊ चव्हाण, यवतमाळ संयोजक किसन भाऊ राठोड, नागपूर संयोजक सुदाम राठोड सहसंयोजिका सौ जयश्री ताई चव्हाण नागपूरविदर्भ सह संयोजक अशोक भाऊ राठोड, अकोला जिल्हा संयोजक डॉ. विजय चव्हाण, अकोला जिल्हा सह संयोजक संदीप राठोड, संकेत भाऊ राठोड तालुका सह संयोजक, नरेंद्र राठोड ता.सह संयोजक ईत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.*