दिव्यांगांच्या जीवनावश्यक मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप ?
अपंग जनता दलाच्या वतीने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले एकदिवसीय ठिय्या आंदोलन
मानोरा:–तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या समस्या लेखी पाठपुरावा करूनही सुटत नसल्यामुळे अपंग जनता दल या संघटनेच्या वतीने तालुका पंचायत प्रशासनाला समस्येची तीव्रता कळविण्यासाठी एक दिवशीय आंदोलन अनेक दिव्यांग बांधवांच्या उपस्थितीत पंचायत समिती परिसरामध्ये नुकतेच करण्यात आले.
शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून देण्यात येणारी दिव्यांग कल्याण व पुनर्वसन ची पाच टक्के निधी त्वरित खर्च करण्यात यावी.
दिव्यांग बांधवांना घरकुल,रोजगार हमी, अंत्योदय या व इतर कल्याणकारी योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येण्यासंदर्भात संघटना स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येऊनही मागण्यांची दखल प्रशासनाकडून घेण्यात येत नसल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे उपस्थितीत एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात येऊन उपरोक्त मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास लेखी निवेदनाद्वारा आणून देण्यात आल्या व सकारात्मक कारवाईची लेखी मागणी करण्यात आली.
#
महाराष्ट्र हे दिव्यांगांच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणारे देशातील पहिले राज्य असूनही तालुक्यातील दिव्यांगांना न्याय मागण्यांच्या पूर्ततेसाठी सातत्याने प्रशासनासोबत झगडावे लागते ही निंदनीय बाब असल्याचे अपंग जनता दलाचे तालुका पदाधिकारी जयकुमार राठोड यांनी यावेळी प्रतिक्रिया नोंदविली.
बॉक्स:–
दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात पंचायत समिती प्रशासन सकारात्मक असून ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसचिवांची यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येऊन दिव्यांग बांधवांचे प्रश्न मार्गे लावण्या संदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
:– संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मानोरा