विवाह वेळेवर लावून वर पित्याने वेळेचे महत्व दिले लक्षात आणून
मानोरा:– तालुक्यातील सोयजना ह्या गावचे मूळ निवासी आणि नोकरी निमित्त शहरामध्ये वास्तव्याला असणारे प्रा. डि.एस. चव्हाण हे वेळेचे पक्के असल्याने कुठलेही काम तंतोतंत ठरवून दिलेल्या वेळेवर करीत असतात. विवाह वेदीवर चढलेल्या आपल्या मुलाचे विवाह वधुकडील आणि वराकडील मंडळींना न तंगवीता शुभ घडीवर लग्न लावून एक वेगळा संदेश तमाम नागरिकांपुढे निर्माण केला आहे.
मानवी जीवनात विवाह संस्थेला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाच्या जीवनात विवाह हे टर्निंग पॉईंट आणत असल्याने आणि विवाह शिवाय प्रत्येकाचा जन्म अपूर्ण मानल्या जाते.
शासन मान्य वयात येताच मुला मुलींसाठी योग्य स्थळांची चाचणी केल्यानंतर व विवाह जमल्यावर वधू आणि वराकडील मंडळी विवाहासाठी मोठ्या प्रमाणात धन आणि वेळ सुद्धा खर्च करीत असतात.
जगात सगळ्यात मौल्यवान वेळ असून वेळेची किंमत जो करतो त्याची किंमत सुद्धा वेळ करीत असल्याने विवाहामध्ये वेळेचे भान राखून शुभकार्य केले जावे यासाठी सोयजना येथील प्रा. चव्हाण यांनी प्रत्येक विवाहामध्ये ठरवून दिलेल्या वेळेनंतर दोन ते तीन तासांनी लागत असलेल्या विवाहाला फाटा देऊन ठरविलेल्या ११ वाजून ४१ मिनिटांनी विवाह लावून वधू कडील आणि वरांसोबत येणाऱ्या वरातींचे वेळ किती महत्त्वाचे आहे हे निदर्शनास आणून दिले.
चि.अनिकेत आणि ची.सौ.का. हेमलता यांचा विवाह धार्मिक रीती रिवाज आणि सगळे सोपस्कार पार पाडून शुभ घडीवर प्राध्यापक चव्हाण यांनी लावून विवाहाला उपस्थित सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला. ११ वाजून ४१ मिनिटांनी असणारा लग्न एक ते दोन तासांनी उशिरा लागेल या अंदाजाने येणाऱ्या काही पै पाहुण्यांना मात्र वधू-वरांच्या डोक्यावर अक्षदा टाकता आल्या नाहीत.