शेतकऱ्यांचा ‘सोटा मोर्चा ‘ तहसील कार्यालयावर धडकणार
मानोरा (प्रतिनिधी) अस्मानी व सुलतानी संकटांमुळे अडचनीत सापडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा आपल्या न्याय हक्काच्या विविध मागण्यांसाठी मानोरा तहसील कार्यालयावर 31 जानेवारी रोजी कॉंग्रेसचे जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या नेतृत्वात ‘सोटा मोर्चा ‘ धडकनार आहे.तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी हातात सोटा घेवुन सहभागी व्हावे असे तालुका कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
सुरुवातीला अतिवृष्टी नंतर दुष्काळी व त्यानंतर अवकाळी तसेच पिकांवरिल विविध किडिंचा प्रादुर्भाव या नैसर्गीक संकटामुळे पिके उद्ध्वस्त झालीत,त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदील झाला आहे.माय-बाप सरकार मानोरा तालुक्यात दुष्काळ घोषीत करतील अशी आस लावुन येथील शेतकरी बसला होता. मात्र मानोरा तालुक्याचे नाव दुष्काळांच्या यादीत नाही केंद्रातील फोकनाड सरकार व राज्यातील धोकेबाज वर चालबाज सरकारने येथील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. येथील शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, लोड शेडिंग जंगली जनावरांचा हैदोस तसेच शेतमालांचे घसरलेले भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. येथील शेतकऱ्यांच्या शेती,सिंचनाच्या अनेक समस्या असून या मतदारसंघातील आमदार यांना शेतीबद्द्ल फारसे ज्ञान नाही व शेतकऱ्यांच्या समस्या काय असतात हे ही समजत नाही , त्यामुळे नैसर्गिक संकटांमुळे शेत पिकांचे वाटोळं झालेले असतांना येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात स्थानिक आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांनी केला आहे. ते मानोरा विश्रामगृहावर ‘सोटा मोर्चा ‘ संदर्भात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
बी-बियाणे,खते व कीटनाशकांच्या वाढत्या किंमती आणि त्यातील बोगसपणा,गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव,सततची नापिकी,कर्जबाजारीपणा,फसवी कर्जमाफी, पीकविम्याची फसवणूक,सतत लोडशेडींगचा होणारा त्रास व जंगली प्राण्यांचा हैदोस अशा असंख्य कारणांनी मेटाकुटीस आलेला शेतकरी आता बर्बाद झाला आहे. अशा हैराण-परेशान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रातील ‘फोकनाड’ सरकार आणि राज्यातील ‘ खोकेबाज’ सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.अस्मानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना दगाबाज केंद्र व राज्य सरकारची कोणतीच मदत मिळण्याची शक्यता नसल्याने आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. तेंव्हा आपल्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन बुधवार 31 जानेवारी 2024 रोजी दुपारी बारा वाजता आपल्या हातात सोटा घेऊन मानोरा तहसील कार्यालयावर निघणाऱ्या छोटा मोर्चात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पत्रकार परिषदेत आपली भूमिका विषद करतांना मोर्चाचे नेतृत्व करनारे कॉग्रेस चे प्रदेश सरचिटणीस देवाणंद पवार यांनी केले आहे. यावेळी प्रदेश सचिव दिलीप भोजराज ,माजी नगराध्यक्ष बरखा अलताफ बेग, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष गजानन राठोड काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, संजय भानावत यांचे सह रामनाथ राठोड,अलताफ बेग, साहेबराव पवार, हाफिज खान, रोशन चव्हाण आदींची उपस्थिती होती .