भाजप सरकारच्या कुटील धोरणाने दुष्काळातून वगळलेल्या मानोरा तालुक्यातील बर्बाद झालेल्या संतप्त शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावरसोटा मोर्चा
नेतृत्व : शेतकरी नेते मा. श्री. देवानंद पवार
मानोरा – यावर्षीचा सुरवातीचा ओला व नंतरचा कोरडा दुष्काळ मानोरा तालुक्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला आहे. तर बी- बियाणे, खते व कीटनाशकांच्या वाढत्या किंमती आणि त्यातील बोगसपणा, गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, फसवी कर्जमाफी, पीकविम्याची फसवणूक, सतत लोडशेडींगचा होणारा त्रास व जंगली प्राण्यांचा हैदोस अशा असंख्य कारणांनी मेटाकुटीस आलेला शेतकरी आता बर्बाद झाला आहे. अशा हैराण – परेशान झालेल्या शेतकऱ्यांना केंद्रातील फोकनाड मोदी सरकार आणि राज्यातील खोकेबाज शिंदे – फडवणीस – पवार सरकारने अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना बेईमान केंद्र व राज्य सरकारची कोणतीच मदत न झाल्याने तो पूर्णतः हवालदिल झाला आहे. तेंव्हा आपल्या न्यायिक हक्कासाठी या धोकेबाज सरकारच्या विरुद्ध संघर्ष केल्याशिवाय आता आपल्यापुढे पर्याय नाही, म्हणून आपल्या हक्काच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी
संतप्त शेतकऱ्यांचा मानोरा तहसील कार्यालयावर बुधवार दि ३१ जानेवारी २०२४रोजी दुपारी १२:०० वाजता सोटा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
© मानोरा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा.
© सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत जाहीर करा.
© कापसाला प्रती क्विंटल १२ हजार रुपये तर सोयाबीनला ८ हजार रुपये भाव जाहीर करा.
© कापूस, सोयाबीन व सर्वच पिकांना पीकविमा जाहीर करा.
© मानोरा तालुक्यातील लोडशेडींग बंद करा
©सिंचनाच्या सोयी व सुविधा उपलब्ध करून द्या.
©महानायक वसंतराव नाईक साहेबांनी शिक्षण घेतलेल्या विठोली येथील शाळेला राज्य किंवा राष्ट्रीय स्मारक घोषीत करा.
© प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांना तात्काळ दरमहा दोन हजार रुपये लागु करा.
© छत्रपती शिवाजी महाराज किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज माफीचा लाभ देण्यात यावा.
© नियमित कर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेला ५० हजार रुपयाचा प्रोत्साहन निधी न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा.
© मानोरा तालुक्याला आकांक्षित तालुका घोषित करा.
© जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
© जंगली डुकरांना मारण्याचा परवाना देण्यात यावा.या मागण्यासह आदी मागण्या करण्यात येणार . आहे
तेंव्हा हातात सोटा घेऊन मानोरा तहसील कर्यालयावर धडक देण्यासाठी शेतकरी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे...
आवाहन कर्ते :
अमोल तरोडकर,
अध्यक्ष, तालुका काँग्रेस कमिटी, मानोरा तसेच
पत्रकार परिषदेत उपस्थित लोकांची नावे………….
….…… . … …………………
…….…… . .. .. ….. ……..
सोटा मोर्चाचा मार्ग : पंचायत समिती ते तहसील कार्यालय, मानोरा जि. वाशिम.