मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पोहरादेवी देवस्थान येथे घेतले दर्शन , मागितला आशिर्वाद
दिग्रस :-
बंजारा समाजाची काशी म्हणून संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेल्या पोहरादेवी येथे मुंबईच्या महापौर व उबाठा नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आज {ता १९} दर्शन घेत पुढील वाटचालीसाठी आशिर्वाद मागितला . त्यांच्यासोबत इतर नेते देखील उपस्थित होते .
उबाठा शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी व इतर नेत्यांनी पोहरादेवी येथील माता जगदंबा , संत सेवालाल महाराज , संत बाबनलाल महाराज , संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले . महंत सुनील महाराज आणि पोहरादेवी येथील सर्व महंतांनी त्यांना अशीर्वाद दिला
संत बाबनलाल महाराज माता जगदंबा महाशक्ती पीठ तसेच सर्व पीठातर्फे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महापौर किशोरी पेंडनेकर , मुख्य प्रवक्ता संजनाताई गडी व इतर महिला पदाधिकाऱ्यांचे महंत सुनील महाराज यांनी बंजारा समाजाचे प्रतीक म्हणून बंजारा गोरपट्टा आणि बंजारा समाजाची ओढणी देऊन सत्कार-स्वागत केले .
ज्येष्ठ नेते या माजी मंत्री संजय देशमुख , वीज महामंडळाचे माजी सदस्य अनिल राठोड , माजी आमदार श्रीकांत मुनगिनवार आदींचेही स्वागत करण्यात आले .
यावेळी निवृत्त जिल्हा न्यायाधीश किशोर राठोड , महंत अनिल महाराज , निवृत्त मुख्य अभियंता मनोहर मसराम , डॉ.सुरेश पवार , रवी पवार ,पुरुशोत्तम कुडवे , रमेश चव्हाण ,वनिवास चव्हाण , तुळशीराम राठोड , राजेंद्र महाराज , केशव महाराज , सुधीर महाराज , बळीराम जाधव , रमेश चव्हाण , जानुसिंग खत्री , राजुदास महाराज , राजाराम नया नाईक , सुभाष राठोड , प्रशांत महाराज , गणेश राजाराम राठोड , जयचंद परशराम , रणवीर पवार , जगराम महाराज ,अशोक राठोड , मोहन राठोड ,अजय महाराजव, विनोद महाराज , प्रशांत महाराज , अक्की महाराजसह असंख्य शिवसेना पदाधिकारी , कार्यकर्ते तसेच गावातील असंख्य महिला व नागरिक उपस्थित होते .
फोटो :—