दिग्रसमध्ये खंडोबाचा चंपाषष्ठी सोहळ्यास प्रारंभ
दिग्रस :
दिग्रस शहराला लागून असलेल्या सुदर्शन नागरित नवनिर्माण कार्य चालू असलेल्या श्रीदत्तात्रयेश्वर मल्हारी मार्तंड जागृत देवस्थान मध्ये आज बुधवारी दि.१३ डिसेंबर रोजी देवस्थानचे संस्थापक महंत गुरूवर्य दत्तात्रय महाराज काळे यांच्या हस्ते चंपाषष्ठी उत्सव सोहळ्यास प्रारंभ झाला आहे. येणारे सहा दिवस या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
चंपाषष्ठी सोहळ्यानिमित्त आज दि.१३ डिसेंबर बुधवार सकाळी ६ वा देवस्थानची पाखाळणी, ९ वाजता श्रीखंडेराया-म्हाळसा देवीचा अभिषेक व सकाळी १० वाजता गुरूवर्य दत्तात्रय महाराज काळे यांच्या हस्ते कलशस्थापना करण्यात आली. महाराजांच्या हस्ते मार्तंड विजय ग्रंथाचे पारायण होणार असून शुक्रवारी दि.१५ डिसेंबर रोजी प्रदोष काळी आचार्य नागेश गुरुजी चौथाईवाले आणि वृंद, राक्षस भुवण यांच्या हस्ते श्रीखंडेरायाचा रुद्राभिषेक होणार आहे. रविवारी दि.१७ डिसेंबर रोजी दुपारी देवाचा रुद्राभिषेक, वनस्पती अभिषेक, मल्हार याग, सायंकाळी ६ वा महानैवद्य, महाआरती व महाप्रसाद, त्यानंतर रात्री १० ते २ श्रीखंडेरायाचे जागरण होणार आहे.
चंपाषष्ठीच्या मुख्य दिवशी सकाळी 3 वाजता देवाचा रुद्राभिषेक तर सकाळी ५.३० वाजता देवाचे लग्न, सकाळी ६ वाजता आरती, लंगर उतरविणे व सकाळी ९ वाजता पालखी सोहळा संपन्न होईल. त्यानंतर ११.३० वाजता महाआरती, तळीभंडार तथा दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या भव्य सोहळ्याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे अहवान देवस्थानचे महंत गुरूवर्य श्रीदत्तात्रय महाराज काळे व देवस्थानचे विश्वस्त यांनी केले आहे.