मागील पंचविस वर्षीपासुन बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश च्या माध्यमातून समाज विविध समस्या व मागण्यांसाठी राज्याभर फिरुन ताड्याच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून देवीदास राठोड यांनी मराठवाडा कृषी विद्यापीठास महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांचे नांव मिळवून घेतलें तांडा सुधार समिती योजनेस भरीव निधी मंजूर करून घेण्यात देविदास राठोड यांचा मोठा सहभाग होता.गोपीनाथ मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचे काम करनाऱ्या देविदास राठोड यांच्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे.त्यांच्या निवडीमुळे समाजाच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्यास व संत सेवालाल महाराज तुम्हाला शक्ती प्रदान करो असे आशिर्वाद महंत शेखर महाराज यांनी संत डॉ रामराव महाराज समाधी स्थळी देविदास राठोड यांच्या नियुक्ती झाल्या मुळे सत्कार करताना दिले.यावेळी महंत संजय महाराज,बंजारा क्रांती दलाचे विर्दभ प्रमुख राजु राठोड ( नाईक ) भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, शेतकरी नेते मनोहर राठोड, माजी सरपंच दिलीप चव्हाण, विलास पवार प्रकत्ता ,मदनलाल राठोड अकोला निलेश जाधव व सहकारी उपस्थीत होते.यावेळी देविदास राठोड यांनी सत्काराला उत्तर देताना मी सामाजिक दायित्वाची अविरत जोपासना करेल.बापु रामराव महाराज यांनी मला तांडा संर्घष यात्रेदरम्यान जो आशिर्वाद दिला त्यांचे पाईक कामं करीत आहे.आता पुढे बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेश चा विस्तार अधिक जोमाने करून येनाऱ्या काळात आरक्षण मेळावा घेनार असल्याचे मनोगत व्यक्त केले