तांडा सुधार समितीची मानोरा येथे महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन
बैठकीत सहभागी होण्याचे महासचिवांचे आवाहन
मानोरा:- भटक्या विमुक्त समाजातील बुद्धिवादी तरुणांची संघटना म्हणून महाराष्ट्रभर परिचित असलेल्या तांडा सुधार समितीची आज दि. १५ ऑक्टोबर २३ रोजी मानोरा येथे आयोजित करण्यात आली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात दुपारी ३:०० वाजता बैठक आयोजित केली असल्याचे अ. भा.तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
विमुक्त जाती प्रवर्गातील घुसखोरी थांबविण्यासाठी विशेष चौकशी समितीचे गठन व तांडा सुधार समितीची भूमिका, येत्या हिवाळी अधिवेशनातील कार्यक्रम, पदाधिकारी निवड व नवीन शाखा स्थापन करणे इत्यादी विषयावर सदर बैठकीत चर्चा होणार असल्याचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. विजय जाधव, महासचिव प्रबोधनकार श्रावण जाधव मालेगाव यांनी कळविले आहे. याप्रसंगी तांडा सुधार समितीचे पदाधिकारी व कार्य करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष प्रा.टी.व्ही. राठोड,
प्रसिध्दी प्रमुख विलास जाधव, विदर्भ प्रमुख जिनकर राठोड, अमरावती विभागप्रमुख सुभाष जाधव, रमेश पवार दिग्रस, गणेश राठोड मा, रामराव चव्हाण, मदन जाधव यांनी केले आहे.