अजय चव्हाण यांची महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या जिल्हा समन्वयक पदी निवड
अजय चव्हाण यांच्या शैक्षणिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे राज्याध्यक्ष दिपक चामे लातूर,राज्य सचिव सतीश कोळी खुलताबाद (संभाजीनगर) राज्य उपाध्यक्ष मेघाराणी जोशी,राज्य सहसचिव राजश्री पाटील यांनी अजय चव्हाण यांची वाशिम जिल्हा समन्वयक पदी निवड केली आहे.अजय चव्हाण हे इंझा पं.स.कारंजा जि.वाशिम येथे कार्यरत आहे.
अजय चव्हाण हे उच्च विद्याविभुषीत एम.ए.एम.एड.असुन उपक्रमशिल व अभ्यासू व्यक्तीमत्वआहे.अजय चव्हाण उत्कृष्ठ संघटक असुन संघटनात्मक कौशल्यामुळे ते अनेक संघटनेमध्ये वेगवेगळया पदावर कार्यरत आहेत.उच्च शिक्षित महाराष्ट्र राज्य एम.एड.कृती समिती वाशिम चे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा संघटक,बीएड पदवीधर शिक्षक संघटना,प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक,Tejas project चे इंग्रजीचे समन्वयक इत्यादी विविध पदावर कार्यरत असुन त्यांचा जिल्हयात दांडगा संपर्क आहे.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल ही एक शैक्षणिक चळवळ असुन महाराष्ट्रात २०१४ पासून कार्यरत आहे.दरवर्षी विविध शैक्षणिक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत असते.शैक्षणिक गुणवत्ता वाढिसाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलव्दारे विविध उपक्रम राबविले जातात.शैक्षणिक अभ्यासदौरा व शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात.राज्यात उत्कृष्ठ शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात.महाराष्ट्र शिक्षक पॅनलमुळे महाराष्ट्रातील उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षकांना हे एक शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरामध्ये भव्यदिव्य अशा सोहळ्याचे आयोजन केले जाते