माजी मंत्री संजय देशमुख यांना मातृशोक
#श्रीमती साविताबाई उत्तमराव देशमुख यांचे निधन
दिग्रस :
माजी मंत्री संजय देशमुख यांना मातृशोक झाला असून श्रीमती सविताबाई देशमुख यांचे दुर्धर आजाराला लढा देत असतांना वयाच्या ८५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.
चिंचोली क्रं.२ येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीदुर्गामाता बहुउद्देशीय क्रीडा व शैक्षणिक संस्था चिंचोली क्रं.२ च्या अध्यक्षा श्रीमती साविताबाई उत्तमराव देशमुख यांचे आज बुधवारी दि.१६ ऑगस्ट रोजी रात्री ९.१५ वाजताच्या दरम्यान दुःखद निधन झाले. दिग्रस विधानसभेचे माजी आमदार तसेच माजी क्रिडा राज्यमंत्री संजय देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या. त्या दुर्धर आजाराशी लढा देत होत्या. त्यांचेवर गेल्या एका वर्षांपासून उपचार सुरू होते. तब्येत ठीक नसल्याने माजी मंत्री देशमुख यांच्या मातोश्रीची भेट घेण्यासाठी म्हणून नुकतीच काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संजय देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत तब्येतीची विचारपूस केली होती. त्यावेळी निवासस्थानीच त्यांचेवर उपचार सुरू होते. बुधवार दि.१६ ऑगस्ट रोजी दुपारपासून त्यांची तब्येत खालावत होती. अशात रात्री ९.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पश्चात माजी मंत्री संजय देशमुख, सुनबाई वैशाली देशमुख, नातवंड तसेच बराच आप्तपरिवार आहे.
उद्या गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीमती सविताबाई देशमुख यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार असून सकाळी ११ वाजता चिंचोली क्रं.२ येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.