पीक विमा फसल योजनेचे सर्व्हर डाऊन
चार दिवसांपासून अर्ज करण्यास अडचण ; शेतकऱ्यांची तारांबळ
दिग्रस :
तालुक्यात मागिल चार दिवसांपासून प्रधानमंत्री पीक विमा फसल योजनेचे फॉर्म सरोवर बंद असल्यामुळे भरल्या गेले नाहीत. त्यात ता.३१ जुलै ही अंतिम तारीख असल्यामुळे केवळ दोन दिवस राहिल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. आपण पीक विमा योजनेपासून वंचीत तर राहणार नाही ना? या विवनचनेत दिग्रस तालुक्यातील शेतकरी वावरत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम २०२३ मध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना पर पीक एक रुपया विमा हप्त्यात त्यांचा पिकांचा विमा उतरविण्याची योजना जाहीर केली. त्यांची अंबाबजावणी राज्यात निवडलेल्या नऊ जिल्ह्यात विमा कंपनीचे माध्यमातून केली जात आहे. शेतकऱ्यांची नोंदणी ही सीएससी सेंटर वरून केल्या जात आहे, परंतु मागील चार दिवसांपासून अर्ज करणाऱ्या वेबसाईटचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पीक विम्याचे अर्ज भरण्यास अडचण जात आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कुठलाही शेतकरी आर्थिक मदतीपासून वंचित राहू नये याकरिता प्रधानमंत्री पीक विमा फसल योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे पिकांना संरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, परंतु ता.३१ जुलै ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यात तालुक्यात झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचा कल पीक विमा योजनेत भाग घेण्यासाठी असून यासाठी शेतकऱ्यांची सुरू असलेली धडपड पाहायला मिळत आहे. मात्र सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतीची कामे सोडून सीएससी सेंटरवर शेतकऱ्यांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.