मोहन जोशी व किशोरकुमार मगर यांचा निरोप समारंभ संपन्न
अमरावती :
नोंदणी व मुद्रांक विभागाचे अमरावती विभाग प्रमुख मोहन जोशी यांची नुकतीच उपजिल्हाधिकारी(महसुल), वाशिम येथे बदली झाली होती. त्यांना दि.३० जुन २०२३ रोजी अमरावती कार्यालयातुन कार्यमुक्त करण्यात आले व वाशिम येथिल उपजिल्हाधिकारी या बदलीचे पदावर दि.६ जुलै २०२३ रोजी रुजु झाले होते. तसेच यापुर्वी अमरावती विभागातील वाशिम येथिल सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किशोरकुमार मगर यांची पुणे येथिल नोंदणी महानिरीक्षक कार्यालयात सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक कार्यासन क्र.९ या पदावर बदली झाली होती. ते सुध्दा त्यांचे बदलीचे पदावर रुजु झाले आहे. याच अनुषंगाने अमरावती विभागातील त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोनही अधिकाऱ्यांना निरोप समारंभात निरोप दिला.
मोहन जोशी यांनी मागील ६ वर्षापासुन नोंदणी उपमहानिरीक्षक, अमरावती या पदाची जबाबदारी अतिशय कार्यक्षमतेने सांभाळली होती. त्याचे कार्यकाळात सर्वच बाबतीत राज्यामध्ये अमरावती विभाग अव्वल ठरला होता. तसेच अमरावती विभागातील प्रलंबित बिंदुनामावली अद्यावत करण्यासाठी त्यांनी व्यक्तिश: पुढाकार घेतल्याने विभागामध्ये अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना नियुक्ती देणे सुखकर झाले होते. तसेच अतिशय मनमिळावु असलेल्या या महसुल विभागाचे अधिका-याने नोंदणी व मुद्रांक विभागातील समस्त अधिकारी व कर्मचारी यांचे मनात मानाचे स्थान मिळविले होते.
त्याच प्रमाणे वाशिम येथिल सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पदावरुन बदलुन गेलेले श्री.किशोरकुमार मगर हे सुध्दा कुशल प्रशासक होते. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ व बुलडाणा या चारही जिल्ह्याचा कारभार एकट्या मगर साहेबांंनी कुठलीही तक्रार न होवु देत समर्थपणे सांभाळला होता. त्यामुळे या दोन्ही कर्तबगार अधिकारी यांच्या निरोपाचा कार्यक्रम अमरावती विभागातील अधिकारी/कर्मचारी यांनी आयोजित केला होता. शनिवार दि.८/०७/२०२३ रोजी हाॅटेल ग्रेस ईन, अमरावती येथे हा निरोपसमारंभ संपन्न झाला. यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक अमरावती विभागाचा पदभार सोपविलेले राजेश राउत यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करतांना अमरावतीचे मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल औतकर यांनी या दोन्ही कर्तबगार अधिकारी यांचे कार्यशैलीचे कौतुक करुन त्यांनी अमरावती विभागास दिलेल्या उत्कृष्ट सेवेबध्दल ऋृणनिर्देश व्यक्त केले. तसेच यापुढे सुध्दा या अधिका-यांकडुन असेच कार्य भविष्यात सुध्दा घडत राहील असा आशावाद व्यक्त करत बदली झालेल्या पदावर जोमाने कार्य करण्यासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. सत्काराला उत्तर देतांना दोन्ही अधिकारी यांनी या भावपुर्ण निरोप समारंभा बध्दल अमरावती विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.
हा कार्यक्रम राजेश राऊत, नोंदणी उपमहानिरीक्षक,नागपुर व अमरावती यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमासाठी अनिल औतकर, सजिनि वर्ग-१, अमरावती व वाशिम, रमेश पगार, सजिनि वर्ग-१, बुलडाणा, विजय तेलंग, सजिनि वर्ग-१,अकोला, बाळासाहेब घोंगडे, सजिनि वर्ग-१,यवतमाळ व प्रविण पेठे,नगर रचनाकार हे प्रमुख अतिथी म्हणुन यावेळी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रभावी व दमदार सुत्रसंचालन कु.सारीका भेंडे यांनी केले. तर कार्यक्रमाची प्रस्तावना धनंजय देशपांडे, दु.नि.कारंजा यांनी केली तसेच आभार प्रदर्शन जयंत डांगोरे यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्विततेसाठी प्रामुख्याने सुधिर मालोकर, राजकुमार आडोळे, शिवम जुमळे, शैलेश माहुरे, विपीन पडोळे, सोमनाथ झडे, किरपाने, गजानन कोकणे, विनोद शिरभाते यांनी विशेष परीश्रम घेतले. या कार्यक्रमास नोंदणी अधिकारी निलेश शेंडे, विजय सुर्यवंशी, भालेराव, विजय राठोड,नितिन कुळकर्णी, सुरेश चक्रे, मंगेश ईंगळे, मनोज ढोले, जुनघरे, नागेकर, अंभोरे, अरविंद बनसोड, केशव सावरकर, मधुकर राखोंडे, सुनिल चव्हाण, भिसे, सुरेश चोपडे, लाहोडे, पवार, राठोड, सोनवने, सौ.सुषमा वेले, सौ. विद्या तळेगावकर, सौ.बेबी मेश्राम, सौ.सुजाता मोरे यांचेसह सौ.प्रणिता मेश्राम, कु.निलिमा डंभारे, कु.सदरे, बालाजी मदने, नितिन चव्हान, निखिल फुलमाळी, संदिप देशमुख यांचेसह अनेक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.