दिग्रस मध्ये ‘दि केरला स्टोरी’ चित्रपटाचे दोन दिवस तिकीट मोफत
◆दिग्रस तालुका बजरंग दलाकडून हिंदू महिला व तरुणींकरिता
दिग्रस :
लव्ह जिहाद सारख्या घातक परिणामांवर आधारित असलेल्या ‘दि केरला स्टोरी’ या चित्रपट मोफत पाहण्याचे दोन दिवसीय आयोजन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा- दिग्रसच्या वतीने करण्यात आले असून हिंदू माता-भगिनींनी हा चित्रपट आवर्जून पाहावा, असे आवाहन बजरंग दलच्या वतीने करण्यात आले आहे. शहरातील शंकर टॉकीज येथे येत्या शनिवारी दि.१३ मे व रविवारी दि.१४ मे रोजी हा चित्रपट हिंदू महिला आणि तरुणींना मोफत दाखविन्यात येणार आहे.
सध्या देशभर 'दि केरला स्टोरी' हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. काही राज्यांनी या चित्रपटाला विरोध करत बंदी घातली आहे, तर काही राज्याने हा चित्रपट करमुक्त केला आहे तरी देखील हा चित्रपट चांगली कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. निव्वळ हिंदू मुलींना टारगेट करून विशिष्ट धर्मीय मुलांकडून लव्ह जिहादसारख्या कृती घडवून आणल्या जात असल्याचे बजरंग दलाकडून सांगण्यात आले आहे. हिंदू समाजामध्ये जनजागृती व्हावी, हिंदू तरुणी या लव जिहाद बाबीला बळी पडू नये, याकरिता बजरंग दलाने मोफत चित्रपट दाखविण्याचे आयोजन केले आहे. हिंदू धर्मातील महिला, तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन चित्रपट पाहावा, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल शाखा दिग्रसच्या वतीने करण्यात आले आहे. मोफत तिकीट साठी बजरंग दल शाखा दिग्रसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
टीप : आमचे न्यूज पोर्टल कोणत्याही समाजात तेढ निर्माण करण्याच्या कोणत्याही प्रकाराचे समर्थन करत नाही.