ना.संजय राठोड मंत्रीपदाची शपथ घेताच सपत्नीक दर्शनाला पोहरादेवीत दाखल
अभिनंदनासह महाराजांनी केले सत्कार
मानोरा:-साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे मंत्री म्हणून राज्याच्या विस्तारित मंत्री परिषदेत नुकताच शपथ घेतलेले ना.संजय राठोड यांनी सपत्नीक विविध पवित्र ठिकाणी नतमस्तक होऊन आशीर्वाद प्राप्त केले यावेळी आ.बाबूसिंग महाराज, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप जाधव आणि महाराज परिवारातील असंख्य सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पंधरा तारखेला सायंकाळी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री केला केला असून मंत्री परिषदेमध्ये दिग्रस दारव्हा नेर चे आ.संजय राठोड यांना पुन्हा स्थान देण्यात आले आहे.
कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात निवड झाल्यानंतर ना.संजय राठोड यांनी आपल्या अर्धांगिनी शितल राठोड यांच्या समवेत दुसऱ्याच दिवशी जगदंबा देवी मंदिर, संत शिरोमणी सेवालाल महाराज मंदिर, संत डॉ. रामराव महाराज समाधी स्थळ आणि भक्तीधाम येथे जाऊन दर्शन घेतले.
आमदार बाबूसिंग महाराज, कबीरदास महाराज, सुनील महाराज, जितेंद्र महाराज, शेखर महाराज, संजय महाराज, नेहरू महाराज, गोपाल महाराज, भक्तराज महाराज आणि महाराज परिवारातील इतर सदस्यांनी नूतन मंत्री ना. संजय राठोड यांचे अभिनंदन करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद देण्यात आला व महाराज मंडळींकडून ना. राठोड यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला. मोठ्या प्रमाणात यावेळी नागरिकांनी पोहरादेवी ला गर्दी केली होती.
फोटो—