मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून पाटणकर आता सेवेत
शासन आणि प्रशासनातील समन्वयाने जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्याची आशा
मानोरा –(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोंडोली निवासी राज्य सरकारच्या वित्त मंत्रालयामध्ये नेमणुकीला असलेले अधिकारी अमोल पाटणकर यांची राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य कार्य अधिकारी (ऑफिसर इन स्पेशल ड्युटी, ओएसडी) म्हणून नेमणूक झाल्याने आकांक्षीत मानोरा तालुक्याच्या प्रलंबित विकासाच्या आणि सोबतच विविध प्रशासकीय समस्या सुटण्याच्या आशा तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झाल्या आहेत.
अनुशेष ग्रस्त वाशिम जिल्ह्यातील कुठल्याही प्रशासकीय विभागाची समस्या असो तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे अवर सचिव असताना पाटणकर यांनी अतिशय तातडीने धसास लावण्याचा अनुभव आतापर्यंत जिल्ह्यातील नागरिकांना आहे.
जिल्ह्यातील अपघात ग्रस्त नागरिकांना तातडीने हलवता यावे यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, विविध रुग्णालयांची दर्जोन्नतीसाठी पाठपुरावा करून विकसित पायाभूत सोयी सुविधा निर्माण करण्यामध्ये त्यांच्या पाठपुराव्यांना यापूर्वी यश मिळालेले आहे.
कारंजा लाड येथील गुरु मंदिर, तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरी गड, श्रीक्षेत्र कोंडोली सोबतच जिल्ह्यातील असंख्य धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रांच्या पुनर्निर्मान आणि पायाभूत सुविधा उपलब्धतेसाठी अमोल पाटणकर यांनी यापूर्वी भरीव कार्य केलेले आहे.
मानोरा तालुक्यातील जीवन वाहिनी असलेल्या अरुणावती नदीचे सौंदर्यीकरण करण्यासाठी सुद्धा पाटणकर यांनी पुढाकार घेतलेला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी जिल्ह्यातील रस्त्यांवर वृक्षारोपणासारखे महत्त्वाकांक्षी कार्यक्रम त्यांनी यापूर्वी ना. फडणवीस यांच्या आशीर्वादाने पूर्णत्वास नेलेले आहेत.
अनुशेष ग्रस्त वाशिम जिल्ह्यातील आकांक्षीत मानोरा तालुक्याच्या सिंचन,शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्वयंरोजगार तथा औद्योगिक विकासाला राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून अमोल पाटणकर यांची नेमणूक झाल्याने अधिक वेगाने चालना मिळण्याचा विश्वास तालुकाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उपटविणारे व भेदभाव न करता सर्वांसाठी सदा सर्वदा उपलब्ध असणारे अमोल पाटणकर हे अधिकारी आता थेट राज्याचे मुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याने प्रचंड आनंद तालुका व जिल्ह्यातील सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहे.
फोटो–