दिग्रस येथे ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सप्ताहानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उद्यापासून आयोजन
२८ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरदरम्यान भरगच्च उपक्रम
भाविक-भक्तांची प्रचंड गर्दी उसळणार
दिग्रस :-
दिग्रस येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा सप्ताहानिमित्त
२८ नोव्हेंबरपासून ५ डिसेंबरदरम्यान भरगच्च धार्मिक , सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . उपरोक्त सर्वच कार्यक्रमात भक्तांची प्रचंड गर्दी उसळणार आहे , हे येथे विशेष !
उद्या गुरुवारी सकाळी ५ वाजता माऊलीचा अभिषेक तद्नंतर कलश स्थापना , रामायण पूजन , श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन ,समाधी सोहळ्याचे अभंग व गुलाल उधळण तसेच हरिपाठ होईल . रात्री ८ वाजता हभप श्री रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होईल .
दररोज सकाळी ८ ते ११ पर्यंत हभप श्री प्रभूदास ठाकरे महाराज यांचे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण होईल , तर हभप श्री हरिओम महाराज निंबाळकर यांच्या कीर्तनाचे दररोज दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत आयोजन करण्यात येणार आहे .
शेवटच्या दिवशी , म्हणजे ५ डिसेंबरला सकाळी ९ वाजता धर्मचार्य व विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सदस्य हभप श्री नारायण महाराज शिंदे यांचे काल्याचे कीर्तन होईल , तर दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे .
उपरोक्त सर्व कार्यक्रम श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिरात होणार असून हभप श्री हरिओम महाराज निंबाळकर शास्त्री यांच्या अमृत वाणीतून दररोज दुपारी १ ते ५ वाजता श्री भागवत कथा ऐकण्यास मिळेल . हभप श्री प्रभूदास ठाकरे महाराज यांचे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ दररोज सकाळी ८ ते ११ या दरम्यान होईल .
हभप श्री वैजनाथ महाराज जामोदकर , हभप चैतन्य महाराज , हभप जितू महाराज चव्हाण , हभप पुरूषोत्तम बोबडे गुरुजी , तसेच गंगाधर कोरडे , ज्ञानेश्वर सवळे , पुरूषोत्तम हारके , गजानन काळे , प्रभू ठाकरे , पवन खोडे , मदन गावंडे , सुधाकर भोयर , तसरच वारकरी मंडळी , लाख , चिरकूटा , तुपटाकळी , सावंगा खु. , वाई-मेंढी आदी ज्येष्ठ महाराज मंडळी व गायक सदर सोहळ्यात प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे .
दिग्रस तालुका वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संयोजक हभप श्री जयराम महाराज गावंडे येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीचे अध्यक्ष पंकज महल्ले , उपाध्यक्ष भूपत शाह , व्यवस्थापक दत्तात्रय इरतकर , मधुकर ठाकरेसह इतर सभासद , भक्तगण समाधी सोहळा सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत असून भाविक-भक्तांनी प्रचंड संख्येत उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा असे आवाहन केले .