*सईताई डहाकेंच्या विजयाने भाजपामध्ये आनंदाला उधान**भाजपाच्या उमेदवाराला प्रचंड जन समर्थन*मानोरा :– भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवारावर शहर व तालुक्यातील मतदारांनी मत रुपी विश्वासाची मोहोर उमटवून सईताई प्रकाश डहाके यांच्या दैदीप्यमान यशात उचललेल्या वाट्याचा आणि पक्षाला राज्यामध्ये मिळालेल्या प्रचंड यशाचा जल्लोष शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला अटीतटीच्या लढतीला सामोरे जावे लागेल अशा मोठ्या प्रमाणात उठविलेल्या आवईंंना श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांनी खोटे ठरवून प्रचंड मताधिक्याने विधानसभेची ही निवडणूक जिंकल्याने भारतीय जनता पक्षावरील जनतेचा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्याचे राज्यामध्ये या पक्षाला मिळालेल्यांना भूतो न भविष्यती यशावरून सिद्ध झाले आहे. मानोरा आणि कारंजा तालुक्यातील प्रत्येक बुथवर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतील घटक पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी केलेले सूक्ष्म नियोजन, पक्षश्रेष्ठींच्या झालेल्या प्रचंड जाहीर सभा, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षावर प्रेम करणारे राष्ट्रीय विचारधारेचे मतदार यांची सांगड यावेळी अचूक रित्या घातली गेल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये पसरविल्या गेलेल्या मिथ्या प्रचाराला जनता यावेळी बळी पडली नाही. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखलेल्या योजना मानोरा आणि कारंजा तालुक्यातील नागरिकांनी या पक्षाच्या महिला उमेदवाराला विक्रमी मताने निवडून देऊन सही (खऱ्या) असल्याचे शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. भारतीय जनता पक्षाकडून निवडून आलेल्या श्रीमती सईताई प्रकाश डहाके यांच्या विजयाचा जल्लोष शहर आणि तालुक्यामध्ये मिठाई वाटून, फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात गुलाल उधळून केला जात आहे.फोटो—