संजय राठोड यांच्या पदयात्रेला आले यात्रेचे स्वरूप
हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित; कार्यकर्त्यांनी केला विजयाचा निर्धार
दिग्रस/जय राठोड
दिग्रस विधानसभा मतदारसंघातील शिवसेना- महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या प्रचारार्थ शनिवार, दि. १६ नोव्हेंबर रोजी दिग्रस येथे भव्यदिव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी उमेदवार संजय राठोड यांच्यासह त्यांचे हजारो समर्थक या पदयात्रेत सहभागी झाले होते. या पदयात्रेने दिग्रस शहरात जनसागर उसळला होता. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (आठवले गट), पीरिपा, लहुजी सेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह उपस्थित जनसमुदायाने यावेळी महायुतीचे उमेदवार संजय राठोड यांच्या विजयाचा निर्धार केला.
आतापावेतो मतदारसंघात गावोगावी प्रचार सभा, कॉर्नर सभा, पदयात्रा घेत संजय राठोड यांनी नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी दिग्रस शहरात प्रचारानिमित्त पदयात्रा काढून नागरिकांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पदयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. पदयात्रेत सर्वसामान्य नागरिकांसह तरुण आणि महिलांची संख्या संख्या लक्षणीय होती. या पदयात्रेदरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.