समनक च्या ययाती नाईक यांनी फोडला प्रचाराचा नारळ
तीर्थक्षेत्राला उसळला जनसागर
मानोरा 🙁साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)
कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघाचे समनक जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ दि.०९ नोव्हेंबर पोहरादेवी येथे हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला.
पोहरादेवी येथील जगदंबा माता, संत सेवालाल महाराज, बामनालाल महाराज, धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन समनक जनता पार्टीचे उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांनी प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी देवी संस्थान च्या वतीने कबीरदास महाराज यांनी उमेदवार ययाती मनोहरराव नाईक यांचा शाल श्रीफळ व प्रसाद देऊन शुभाशीर्वाद दिले. तसेच बामनालाल महाराजांच्या मंदिर प्रांगणात सुनिल महाराज यांनी कवलपट्टा व पगडी बांधून ययाती नाईक यांचे भव्य स्वागत केले. तर उमरीगड येथे संत जेतालाल महाराज, सामकी याडी, प्रल्हाद महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले याठिकाणी यशवंत महाराज यांनी नाईकांचे स्वागत केले. तर गोर धर्म पिठावर जाऊन संत हमुलाल महाराज व जगदंबा देवीचे दर्शन घेतले.
यावेळी समनकचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.संदेश चव्हाण, राष्ट्रीय महासचिव प्रा.डॉ.अनिल राठोड, सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा.संदेश चव्हाण, प्रा. डॉ.अनिल राठोड, उमेदवार ययाती नाईक यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष गजानन धामणे यांच्या नेतृत्वात कारंजा तालुकाध्यक्ष आकाश पवार, प्रकाश राठोड, सुनील राठोड, बाबूभाई बेनिवाले, गोपाल चव्हाण,
सौ. निता चव्हाण, सौ. प्रमिला आडे, सुनील जाधव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी सुनील पाटील, प्रा.दयाराम गव्हाणे, सुनिल महाराज, बाजार समिती संचालक चिंतामण चव्हाण, किसनराव राठोड, प्रकाश राठोड, प्रा. जय चव्हाण, गणेश जाधव सरपंच, काळूसिंग आडे, शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्यासह हजारो नागरिकांची उपस्थिती होती.