दिग्गज नाईक घराण्याची कारंजा मानोरा मतदारसंघांमध्ये एन्ट्री
वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक यांनी समानक जनता पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज
मानोरा–(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज बुलेटिन) महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या घराण्यापैकी एक नाईक घराण्यातील ययाती मनोहरराव नाईक यांनी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघ संघातून निवडणूक लढविण्यासाठी संमणक जनता पक्षाचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवडणूक अर्ज सादर केल्याने जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाची भूमिका वठविणारे व सर्वाधिक काळ राज्याचे मुख्यमंत्रीपदी राहिलेले वसंतराव नाईक यांचे नातू तथा त्याच घरातील दुसरे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष ययाती मनोहरराव नाईक यांनी समनक जनता पक्षाच्या वतीने कारंजा मानोरा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आज आपली उमेदवारी दाखल केली.
ययाती नाईक यांचे लहान भाऊ आमदार इंद्रनील नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुसद मतदार संघातून निवडणूक लढवीत आहेत.
ययाती नाईक यांचे वडील मनोहरराव नाईक हे सुद्धा अनेक वर्षे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्रीपदावर कार्यरत होते.
माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांचे राज्याच्या राजकारणामध्ये असलेले आदराचे स्थान व कारंजा मानोरा मतदारसंघांमध्ये नाईक घराण्याचा असलेला वलय व या घराण्याला चाहणारे सर्व समाजातील मतदार ययाती मनोहरराव नाईक यांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.
बॉक्स:–
१)
वसंतराव नाईक साहेबांचे मानोरा तालुक्याशी असलेले बालवयापासूनचे संबंध ते राज्याच्या शीर्ष नेतृत्वापर्यंत असताना कायम होते.ती परंपरा माझे मोठे वडील माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक, वडील मनोहरराव नाईक साहेब यांनी टिकवून ठेवले होती त्या परंपरेचा पाईक होऊन दोन्ही तालुक्याची सेवा करण्याचा मी या निवडणुकीच्या निमित्ताने संकल्प करीत असल्याच्या प्रतिक्रिया ययाती मनोहरराव नाईक यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ व्यक्त केल्या.
२) महाविकास आघाडीचा घटक पक्ष भाजपाकडून सईताई प्रकाश डहाके तर महाविकास आघाडीचा घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून एड.ज्ञायक राजेंद्र पाटणी, वंचित बहुजन विकास आघाडी कडून सुनील धाबेकर, एमआयएम पक्षाकडून मोहम्मद युसुफ पुंजाणी, प्रहार जनशक्ती पक्षाकडून डॉ.महेश चव्हाण यांनी तथा काँग्रेस पक्षाचे प्रदेश पदाधिकारी देवानंद पवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती ज्योतीताई गणेशपुरे,माजी सभापती जय किसन राठोड आदींनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपले नामांकन अर्ज दाखल केले आहेत.
फोटो—