दिग्रसच्या ३५ ज्यूडो खेळाडूंनी मुंबई येथील आंतरशालेय स्पर्धेत केला ३३ पदकांचा वर्षाव !
सर्वत्र कौतुक व अभिनंदन
दिग्रस :-
दिग्रस येथील ३५ पैकी तब्बल ३३ खेळाडूंनी मुंबई व्हिवा व्हिबग्योर आंतर शालेय ज्यूडो स्पर्धेत दणदणीत यश संपादन करत ३३ पदकांवर आपले नाव कोरून पुनः इतिहास रचला . यामध्ये १७ सुवर्णपदक , दहा रौप्य आणि सहा कास्यपदकांचा समावेश असून विजेत्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
मुंबई येथील व्हिवा व्हिबग्योर शाळेच्या भव्यदिव्य प्रेक्षागृहात नुकतेच संपन्न झालेल्या सदर आंतरशालेय स्पर्धेत धन्वी कुटे , काव्या गुघाणे , संस्कृती आडे , जागृती राठोड , आर्मीश बाळापुरे , रिया डिके , पोर्णिमा सातपुते , भाग्यश्री राठोड , विशाका खंडारे , तर मुलांमधून अनघ वऱ्हाडे , आयुष मालधारी , जैद अब्दुल रफिक , द्विज माहुरे , वेदांत पारधी , मनीष मुजमुले , अर्जुन सातपुते , एम. सारीम एम. वाहिद या १७ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक प्राप्त केले .
दिग्रस येथीलच रिया सातपुते , आरोही ढोरे , वैष्णवी खिर्डे , सारंगी चव्हाण , रिद्धी पवार , गायत्री पवार , यश हळदे , मआज शेख , श्रीहरी खानझोडे , सार्थक नेवारे हे दहा विद्यार्थी रौप्य पदकास पात्र ठरले . आर्यन बोहणे , श्लॊक तायडे , गौरिक सरबेरे , आतिफ बाळापुरे , हर्ष हळदे , अयान बेग या सहा विद्यार्थ्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले .
दिग्रस येथील बूटले महाविद्यालयात मोफत चालविण्यात येणाऱ्या ज्यूडो प्रशिक्षण केंद्राचे सर्व विद्यार्थी आहे . ते आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि ज्यूडो प्रशिक्षक श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेता प्रा. डॉ. रविभूषण माणिकराव कदम आणि संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार बंग आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद लाडोळे यांना देतात . मुंबईसारख्या मोठया शहरातून ३३ पदक आणल्याबद्दल सर्वांचे कौतुक व अभिनंदन होत आहे .
फोटो :—