प्रधानमंत्र्यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने पोहरादेवी जाणाऱ्या वाहतूक मार्गात बदल
वाशिम,दि.४( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) ५ ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र पोहरादेवी येथे प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचा संभाव्य दौरा असुन या संभाव्य कार्यक्रमाला जिल्हयातील व लगतच्या
जिल्हयातील बहुसंख्य नागरीक उपस्थित राहणार आहेत. पोहरादेवी व परिसरातील रस्ते अरुंद असल्याने राज्य परिवहन मंडळाच्या बसेस व खाजगी वाहने मोठया प्रमाणात येणार आहे.
प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सभा परिसर व लगतच्या भागामध्ये वाहतुकीस अडथळा
होउ नये तसेच सर्वसामान्य जनतेची गैरसोय होउ नये व वाहतुक सुरळीत राहावी म्हणून पोहरादेवीकडे येणारी जाणारी
वाहतुक दिनांक ५ ऑक्टोबर रोजीच्या ००.०१ वाजेपासून रात्री ८ पर्यंत वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.
शासकीय वाहने व अत्यावश्यक सेवा वाहनांकरीता धानोरा फाटा -शेंदुरजना पोहरादेवी मार्ग
वाहतुकीकरीता सुरु राहील.
बंद करण्यात येणारे मार्ग
दिग्रस – मानोराकडे सर्व जड वाहनास जाण्यास
मनाई असून प्रतिबंधित मार्ग वगळून इतर मार्गांचा वापर करावा किंवा वाहने दिग्रस मानोरा रोड व्यतिरिक्त इतरत्र पार्क करून ठेवावीत.
पुसदकडुन येणाऱ्या सर्व वाहनांना सिंगद फाटा
कडुन बायपास मार्गे पोहरादेवी गावात जाण्यास
मनाई आहे. यासाठी पर्यायी व्यवस्था सिंगद फाटा येथुन दिग्रस मार्गे जातील.
वाशिमकडुन धानोरा मार्गे येणाऱ्या सर्व वाहनांना
पोहरादेवी गावात जाण्यास मनाई आहे. पर्यायी व्यवस्था वाशिम कडून येणारी वाहने मंगरूळपीर – मानोरा मार्गे जातील.
शेंदुरजना, फुलउमरी व उमरी येथुन पोहरादेवी
गावात जाण्यास मनाई आहे. पर्यायी व्यवस्था रतनवाडी येथून हातोली गव्हा मानोरा मार्गे जातील किंवा भुली माहुली मार्गे वायघूळ कडे जातील.
पोहरादेवी, वसंतनगर येथुन सभास्थळाकडे
जाण्यास मनाई आहे. पर्यायी व्यवस्था वडगाव धावंडा मार्गे दिग्रसकडे जातील.
गहुली, शेंदोना, सोमेश्वर नगर मार्गे पोहरादेवी
गावात जाण्यास मनाई आहे. पर्यायी व्यवस्था सोमेश्वर नगर शेंदोना गहुली मार्गे पुसद दिग्रस रोडने दिग्रस कडे जातील.
वाईगौळ ते फुलउमरी दरम्यान रोडवर सर्व वाहनांना मनाई आहे. पर्यायी व्यवस्था प्रतिबंधित नसलेल्या मार्गांचा वापर करावा.
पंचाळा फाटा ते पोहरादेवी मंदिर परिसर दरम्यान रोडवर सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई आहे. पर्यायी व्यवस्था प्रतिबंधित नसलेल्या मार्गांचा वापर करावा.
तरी नागरीकांनी आपली गैरसोय होवू नये या करीता मनाई केलेले मार्ग वगळुन इतर मागांचा वापर करुन आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. असे पोलिस विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.