दिग्रस येथील चार खेळाडूंची केरळ येथे होणाऱ्या “राष्ट्रीय महिला लीग ज्यूडो स्पर्धेसाठी” निवड
सर्वत्र कौतुक व अभिनंदन
दिग्रस 🙁साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)
दिग्रस येथील चार विद्यार्थिनींनी नाशिक येथे झालेल्या “अस्मिता महिला लीग स्पर्धेमध्ये” कास्यपदक प्राप्त केले असून त्यांची केरळ येथे होणाऱ्या “राष्ट्रीय महिला लीग ज्यूडो स्पर्धेसाठी” निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .
याबाबत सविस्तर असे की येथील एकूण 18 मुलींनी नाशिक येथे नुकतेच संपन्न झालेल्या “अस्मिता महिला लीग स्पर्धेमध्ये” सहभाग घेतला होता . येथे गोवा , महाराष्ट्र , छत्तीसगढ , मध्यप्रदेश , राजस्थान , गुजरात , दीव-दमनसह इतर राज्यातील असंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता .
दिग्रस येथील पौर्णिमा सातपुतेने 28 किलो वजन गटात कास्यपदक प्राप्त केले , आईशा फैजान शेखने 40 किलो वजन गटात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे , अनुश्री कायंदे हिने सब ज्युनिअर गटात 44 किलो खालील वजन गटात कास्यपदक प्राप्त केले , तर स्नेहल नंदकिशोर ढोरे कॅडेट गटात 40 किलो खालील गटात कास्यपदक प्राप्त करून शहराला पुनः लौकिक मिळवून दिले . दिल्ली येथे झालेल्या इंडिया रँकिंग ज्यूडो स्पर्धेत श्रावणी सतीश डिकेने कास्यपदक प्राप्त केल्याने तिची देखील केरळ येथे होणाऱ्या वुमन्स लीग राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे .
दिग्रस येथे बीएनबी महाविद्यालयात चालविण्यात येणाऱ्या ज्यूडो प्रशिक्षण केंद्रातील पाच विद्यार्थिनींनी कास्यपदक प्राप्त केले असून त्यापैकी चार जण राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे .
दिग्रस येथील बीएनबी महाविद्यालयात निशुल्क चालविण्यात येणाऱ्या ज्यूडो प्रशिक्षण केंद्राचे सर्व विजेते विद्यार्थी प्रशिक्षणार्थी आहेत . त्या सर्वांना शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्रा. डॉ. रविभूषण माणिकराव कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे . सर्व विजयी विद्यार्थिनींनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि प्रशिक्षक डॉ. रविभूषण माणिकराव कदम आणि संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार बंग , प्राचार्य अरविंद लाडोळे यांना देतात . विजयी विद्यार्थिनींवर कौतुक व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .