म्हसणी येथे ‘हर घर तिरंगा’ अंतर्गत ‘तिरंगा रॅली’
अभियाना अंतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मानोरा-- (साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्यूज ). ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान देशभर 'हर घर तिरंगा' म्हणजेच 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय म्हसणी येथील विद्यार्थ्यांनी 'तिरंगा रॅली' काढून घरोघरी तिरंगा लावण्याबाबत संदेश देवुन जनजागृती करण्यात आली.
भारतीय जनतेमध्ये खास करून नवीन पिढीच्या युवकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत व्हावी व या राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त जनतेने सहभाग घ्यावा याकरिता हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत तिरंगा यात्रा, रॅली, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम,तिरंगा मानवंदना, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा दौड तिरंगा कॅनव्हास, आधी विविध उपक्रम रॉबिले जाणार आहेत. त्या अनुषंगाने तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय म्हसणी येथील विद्यार्थ्यांनी गावामधून तिरंगा रॅली काढून घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले. त्यानंतर विद्यालयाच्या प्रांगणात ‘तिरंगा दौड’ चे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.उपरोक्त उपक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होत सदर उपक्रम ऊत्साहाने साजरा केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण ठाकरे, शिक्षक राजेश पाटील ,राजू मेथडे,शिक्षिका कु.भारती मुराळे,कर्मचारी ए.आर. ठाकरे व आर डी ठाकरे , शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.