भक्तगणांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र कोंडोली येथे सुसज्ज भक्तनिवास निर्मिती व घाट विकास होणार
भूमीपुत्र अमोल पाटणकर यांच्या पाठपुराव्याची फडणवीस साहेबांकडुन दखल
मानोरा:–(साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क) श्री पितांबर महाराज यांच्या श्रद्धेपोटी कोंडोली येथे येणाऱ्या भक्तगणांचे आबाळ होऊ नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेल्या पाठपुराव्याची दखल घेण्यात येऊन या गावाला मोठे भक्तनिवास, घाट विकास व तत्सम पर्यटन विकासाच्या कामाला शासनाकडून मंजुरात देण्यात आली आहे.
कोंडोलीचे मूळ निवासी व वित्त विभागात अवर सचिव पदावर कार्यरत असलेले अमोल पाटणकर यांच्याकडून स्थानिक व परगावातून येणाऱ्या श्री पितांबर महाराज यांच्या भक्त गणांना उच्च पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत.
केवळ आपले गावच नाही तर विशेषतः मानोरा आणि कारंजा तालुक्यातीलही नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी पाटणकर यांच्या प्रयत्नांची वेळोवेळी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे कडून यापूर्वीसुध्दा घेण्यात आलेली आहे.
पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून श्रीक्षेत्र कोंडोली येथील पितांबर महाराज देवस्थान परिसरात भक्त निवास व तत्सम पर्यटन विकास कामासाठी एक कोटी पन्नास लक्ष रुपयाची निधी राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून मंजूर करण्यात आल्याचे शासन निर्णय नुकतेच जारी झाल्याने या तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भक्तगणांसाठी भक्त निवासाची निर्मिती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
फोटो:– पितांबर महाराज देवस्थान