काँग्रेसच्या समस्या शोध दिंडीची सुरूवात धूम धडाक्यात मानोरा. – प्रदेश काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस तथा जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार याच्या नेतृत्वात दि. ९ ऑगस्ट क्रांती दिनी व नागपंचमी या पावन पर्वावर तालुक्यातील श्रीक्षेत्र आसोला खुर्द येथील भगवान शिव शंकराचे परम भक्त महान तपस्वी परमहंस श्री सोहंमनाथ महाराज यांचे दर्शन घेवून कॉग्रेसच्या समस्या शोध दीडींला प्रारंभ झाला. यावेळी तालुक्याच्या कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.तब्बल एक महिनाभर चालणाऱ्या समस्या शोध दिंडीच्या माध्यमातून पहिल्या पंधरवडय़ात तालुक्यातील गावागावात जाऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात येणार आहे. तर दुसर्या पंधरवडय़ात मतदार संघातील कारंजा तालुका व शहरातील समस्या नागरिकांकडून जाणुन घेऊन पाच वर्षांच्या कालावधीत ज्या ज्या समस्या सुटलेल्या नाहीत, त्याचा संपूर्ण लेखाजोगा जनतेसमोर माडण्यात येणार आहे.या समस्या शोध दिंडीत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातील नागरिक तसेच काँग्रेस कार्यकर्त व पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेखार पटेल, जिल्हा सरचिटणीस निलेश कानक़ीरड, काँग्रेसचे पदाधिकारी संदेश जिंतूरकर, रामनाथ राठोड, कारंजा तालुका अध्यक्ष विजय देशमुख, शहर अध्यक्ष अमीर खान पठाण, मानोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर, युवक कॉग्रेसचे अध्यक्ष महेश जाधव, शहर काँग्रेस अध्यक्ष हाफिज खान, गोपाल चिस्तळकर, महीला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष नंदा तायडे, माजी नगराध्यक्ष बरखा अलताब बेग आदी कॉग्रेस पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी कॉग्रेसच्या शोध समस्या दिंडीत सहभाग नोंदविला होता.