प्रतिभावंतांचा मानोरा येथे सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
गोरसिकवाडीच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
मानोरा–( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क)गोरसेना गोरसिकवाडी पुरस्कृत रायसिना फाउंडेशन च्या वतीने मानोरा येथे दि.४ ऑगस्ट ०२४ सकाळी ठीक ११ वाजता पं. स. मधील वसंतराव नाईक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेला होता.यामध्ये सर्वप्रथम सेवालाल महाराज, रामराव महाराज, वसंतराव नाईक व काशिनाथ नायक यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले व पारंपरिक पद्धतीने जळभोग लावण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकलसींग राठोड यांनी केले तर प्रमुख भाषणामध्ये अनिल जाधव उत्कर्ष कोचिंग क्लासेस संचालक मानोरा, नवनियुक्त सहाय्यक अभियंता सौरव चव्हाण, निवासी नायब तहसीलदार संदीप आडे यांनी विचार मांडले.
सरतेशेवटी मुख्य वक्ते म्हणून मोतीरज जाधव विभागीय यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला प्रेमसिंग राठोड माजी कृषी उत्पन्न बाजार सभापती, मनोहर राठोड परिवर्तन शेतकरी संघटना, दिलीप चव्हाण सामाजिक कार्यकर्ते, श्याम राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद,गणेश जाधव सर,एस.पी.जाधव सर, संतोष जाधव कारभारी राहुल पार्क,डिंगाबर चव्हाण,अनिल जाधव,विकलसींग राठोड, पंकज चव्हाण उपसरपंच कारपा, सुनिल राठोड तालुकाध्यक्ष, धनराज राठोड,लखन राठोड, रविंद्र जाधव, ज्ञानेश्वर राठोड,उत्तम पवार,शाम जाधव हे हजर कार्यक्रमाचे संचालन गोपाल चव्हाण जि. उपाध्यक्ष यांनी केले होते.यावेळी गौरव चव्हाण अभियंता जलसंपदा विभाग मानोरा, गोपाल चव्हाण राज्य उत्पादन शुल्क नाशिक,कु.विजया जाधव स्टाफ नर्स चंद्रपूर, परमेश्वर राठोड जि.प. रायगड, सुनिल राठोड आरोग्य सेवक कुपटा यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे एकूण १८७ विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती तरी पण विद्यार्थ्यी यावेळी मोठ्या संख्येने या गुणवंत सत्कार सोहळ्यामध्ये हजर झाले होते.