राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची कारंजा रेस्ट हाऊस वर बैठक
बाबाराव पाटील खडसे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात बैठकीचे नियोजनआक्रोश मोर्चा विषयी केले मार्गदर्शन
कारंजा दि.4 ऑगस्ट( साप्ताहिक दिग्रस एक्सप्रेस)
दिनांक 6 ऑगस्ट रोजी कारंजा येथील तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार आहे.या मोर्चाच्या संदर्भातआज दि.4 ऑगस्ट कारंजा येथे रेस्ट हाऊस मध्ये पक्षाच्या वतीने मार्गदर्शनपर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.या सभेमध्ये आक्रोश मोर्चा विषयी माजी आमदार अनंत कुमार पाटील,डॉ.श्याम जाधव,ज्योतीताई गणेशपुरे यांनी मार्गदर्शन केले.महायुती सरकारने शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव न देता मातीमोल भावाने शेतमाल खरेदी केल्यामुळे शेतकरी हलादिल झाला.शेतकऱ्याच्या खरडून गेलेल्या जमिनीकडे, पिक विमा कडे,सरकारने दुर्लक्ष करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, शेतकऱ्याने पेरणी पासून मळणीपर्यंत केलेला खर्च सुद्धा शेतकऱ्याच्या पदरात पडला नाही परिणामी शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर