शाळांना वाढीव टप्पा अनुदान देण्याची मागणी.शिक्षक समन्वयक संघटनेचे धरणे आंदोलन.
वाशीम : विना अनुदानित शाळांना अनुदान द्यावे,अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना १ जानेवारी २०२४ पासून विना अट प्रतिवर्षी पुढील टप्पा द्यावा,त्रुटी पूर्ण केलेल्या शाळांना,तुकड्यांना समान टप्पा अनुदान द्यावे,अघोषित शाळांना घोषित करून अनुदान द्यावे,आदी मागण्यासाठी आज दिनांक २४ जुलै रोजी वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर शिक्षक समन्वय संघाचे वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी भेट दिली.संभाजी ब्रिगेड,मनसे यांनी पाठींबा दिला.
जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी आंदोलनास भेट देऊन निवेदन स्वीकारले.
शेवटी समन्वय संघाचे वतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले की,१२ जुलै रोजी राज्याचे शिक्षण मंत्री यांनी टप्पा वाढ अनुदानाबाबत विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढ करण्याची घोषणा केली आहे. प्रतिवर्षी टप्पा वाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच विधानभवनातील घोषणेनुसार एक जून२०२४ पासून टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
म्हणून ३० जुलै पूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तात्काळ शिक्षक व शिक्षकेतर यांच्या खात्यावर पगार जमा करावी.
अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांना एक जानेवारी २०२४ पासून विनाअट २०२३- २४ च्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करावा.अशी मागणी करण्यात आली.
शासन निर्णय २०१२,२०१५ आणि २०२४ मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्याना समान टप्पा वाढ देणे,राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे,
३० जुलै २०२४ पर्यंत टप्पा वाढ सह अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे.या व अशा अन्य मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी स्वराज्य शिक्षक संघटनेचे वाशीम जिल्हा अध्यक्ष जी .एस. बोरकर, उच्च माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत कव्हर,कायम विना अनुदानित शाळा समितीचे उपेंद्र पाटील यांचे सह गजानन इंळे प्रसिद्ध प्रमुख, दिगंबर गुडदे विभागीय संघटक, जगदीश गोरे जिल्हाध्यक्ष शिक्षकेतर संघटना, संतोष वाझुळकर जिल्हाध्यक्ष मालेगाव, संतोष जाधव जिल्हाध्यक्ष मानोरा, पंडित देशमुख, सपकाळ सर ,सुनील अवगण, माणिक डेरे, किशोर जाधव आदी शिक्षक समन्वय संघाचे पदाधिकारी आणि शेकडो शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
फोटो..