सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे आज आयोजन
तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून कार्यशाळेचे लाभ घेण्याचे तालुकावाशीयांना आवाहन
मानोरा–तालुक्यातील नवउद्योजक, शेतकरी, महिला बचत गट, वैयक्तिक लाभार्थी, युवक, युवती, सुशिक्षित बेरोजगारांकरिता प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत विशेष कार्यशाळेचे आयोजन दि.२३ जुलै ०२४ मंगळरवार रोजी चेतना केंद्र सभागृह, ठाकरे पॅलेस समोर, मंगरुळनाथ रोड येथे सकाळी ११ वाजता तालुका कृषी अधिकारी मानोरा यांचे विद्यमाने करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वाशिम आरिफ शहा, प्रकल्प संचालक आत्मा अनिसा महाबळे, जिल्हा क्षेत्रीय अधिकारी गोपाल मुठाळ मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या योजनेची माहिती जाणून घेणे, या योजनेमध्ये भाग घेणे, याकरिता तालुक्यातील सर्व नव उद्योजक, उद्योग करू इच्छिणारे शेतकरी, वैयक्तिक पुरुष, महिला, युवक, युवती, महिला बचत गट, पुरुष बचत गट, कंपनी तसेच यापूर्वी ज्यांनी उद्योग सुरू केलेला आहे आणि त्यांना पुढे उद्योग विस्तार करून चालू ठेवण्यासाठी त्यावर अनुदान घ्यावयाचे आहे अशा सर्व लाभार्थी मंडळींनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
कार्यशाळेमध्ये शेती उत्पादनावर आधारित उद्योग चा समावेश होतो तसेच वैयक्तिक लाभार्थी करिता एक लाख रुपये पासून एक कोटी रुपये पर्यंत कर्जावर पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपये शासकीय अनुदान मिळू शकते. आणि स्वयंसहायता गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रकल्प किमतीच्या ३५% किंवा जास्तीत जास्त तीन कोटी रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते. याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सर्व संबंधित लाभार्थीनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मानोरा उमेश राठोड यांनी केले आहे.