मानोरा आणि कारंजा ही तालुके ना.फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे आलीत जगाच्या नकाशावर
अध्यात्मिक विकासासोबतच इतर अनुशेष पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा उभयतांचा दावा
मानोरा :–तालुक्याच्या मागासलेपणावर मात करण्यासाठी राज्याचे कर्तुत्ववान उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन त्यांचे अव्वर सचिव अमोल पाटणकर यांच्या भेटीदरम्यान भक्तराज महाराज यांनी केले.
कारंजा-मानोरा मतदारसंघातील मानोरा तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सध्याच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले व यापूर्वीच्या भाजप शिवसेना युती सरकार असताना मुख्यमंत्री असलेले ना.देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचे त्यांचे अव्वर सचिव पाटणकर यांची भेट घेतली असता चर्चेदरम्यान भक्तराज महाराज यांनी मत व्यक्त केले. बंजारा आणि कोट्यावधी बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी, उमरी गड तीर्थक्षेत्र विकास योजनेचा प्रारंभच ना. फडणवीस यांच्या दुर दृष्टिकोनामुळे सुरू होऊन या भागाचा आध्यात्मिक कायाकल्प प्रगतीपथावर आहे.
आध्यात्मिक विकासासोबतच या परिसरातील औद्योगिक,शैक्षणिक, सिंचन,आरोग्य विषयक आणि पायाभूत सुविधांचा विकास जलद गतीने होण्यासाठी ना.फडणवीस सकारात्मक असल्याचे भेटी दरम्यान मानोरा तालुक्यातीलच मूळ रहिवाशी अमोल पाटणकर यांनी महाराज यांना सांगितल्याची माहिती भक्तराज महाराजांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
#
मानोरा व कारंजा तालुक्यातील विविध विभागातील प्रलंबित अनुशेष भरून काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याची माहिती सुद्धा भक्तराज महाराजांनी दिली.