दिग्रस इन्नरव्हील क्लबतर्फे “एक पेड मां के नाम” अंतर्गत वृक्षारोपण
दिग्रस :-(दिग्रस एक्सप्रेस न्युज नेटवर्क,)
दिग्रस इन्नरव्हील क्लब च्या वतीने रामनगर येथील रामदास आठवले मागासवर्गीय कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी परिसरामध्ये क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
पर्यावरणाचे संतुलन वृक्षतोडीमुळे बिघडत असल्यामुळे शासनाच्या वतीने,” एक पेड मां के नाम ” या उपक्रमा ला अनुसरून, इनरव्हील क्लबच्या वतीने सर्वत्र वृक्ष लावगड करणे हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 14 जुलै 2024 रोजी वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रकारच्या वृक्षांची लावगड क्लबच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केली .
अध्यक्ष शाहीन डोसांनी यांनी वृक्ष लागवडीचे महत्त्व आपल्या भाषणामध्ये विशद केले . सदर वृक्षांचे जतन करण्याची प्रतिज्ञा देखील यावेळी घेण्यात आली . इन्नरव्हील क्लबच्या वतीने शहरात सतत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केली जातात . त्यासाठी सर्व स्तरातून अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभत आहे.
दिग्रस इन्नरव्हील क्लबच्या अध्यक्ष शाहीन डोसानी , उपाध्यक्ष डॉ परिणीता आसेगावकर , सचिव शीतल पाटील , समन्वयक मंजू बनगिनवार , कोषाध्यक्ष उज्वला मानकर , सीसीसी हेमा अग्रवाल , आयएसओ मयुरी चव्हाण , सुविधा बनगिनवार , स्वाती पद्मावार , डॉ छतानी , करुणा पाटील , वर्षांनी, छायाताई आडे तथा इतर सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते .
फोटो:—