तांत्रिक अडचणींवर मात करून नागरिकांना तत्पर सेवा देण्याचे तहसील कार्यालयाचे प्रयत्न
दोन आठवड्यात तब्बल ६९२७ दाखल्यांचे वितरण
मानोरा:– तालुका हा आकांक्षीत असून असून या ठिकाणी वारंवार विद्युत पुरवठा खंडीत होणे, नेटवर्क ची पाहिजे तेवढी गती न मिळणे यामुळे ऑनलाईन ची कामे करतांना बऱ्याच वेळेस अधिकारी कर्मचारी यांना खुप मोठ्या प्रमाणात त्रास होतो तरी सुद्धा तहसील कार्यालयाने या परिस्थितीवर मात करून रात्रंदिवस एक करून नागरिकांना गतीने दाखले वितरित करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पुढे येत आहे.
मानोरा तहसील कार्यालया अंतर्गत १ जुलै ते १४ जुलै ह्या दोन आठवड्यात ५०४१ उत्पन्नाचे दाखले व १८८६ रहिवासी दाखले नागरिकांना वितरित करण्यात आल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संदीप आडे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.
सेतू विभागाचे महसूल सहाय्यक सतिश राघोते यांनी रात्री उशिरा बसून हें काम केले त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले नागरिकांना मिळू शकले.
शहर व तालुक्यातील नागरिकांना तातडीची सेवा मिळण्यासाठी तहसील कार्यालयातील कामाची गती व कामात पारदर्शकता आनखी कशी आणता येईल या प्रयत्नात उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती सुद्धा आडे यांनी दिली.