कारंजा मानोरा विधानसभा स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे मा.शरदचंद्र पवार यांची शिष्टमंडळांनी घेतली भेट…!
कारंजा मानोरा- (दिग्रस एक्सप्रेस न्यूज नेटवर्क)आगामी विधानसभा निवडणुकीत कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे,अशी मागणी शिष्टमंडळाने मा.शरदचंद्र पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे.
कारंजा आणि मानोरा तालुक्यातील महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उमेदवारांचा मुद्दा उचलून धरला तसेच महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची एका शिष्टमंडळाद्वारे प्रत्यक्ष भेट घेऊन स्थानिक इच्छुक उमेदवारांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी दि.५जुलै रोजी मा. शरदचंद्र पवार यांना केली आहे.
त्याचप्रमाणे महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाचे नेते मा.राहुल गांधी यांची सुद्धा शिष्टमंडळ भेट घेऊन स्थानिक इच्छुक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करणार आहे.
दरम्यान रा.कॉ नेते मा.शरदचंद्र पवार यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात रा.कॉ प्रदेश संघटक सचिव अरविंद पाटील इंगोले,प्रदेश सरचिटणीस डॉ.श्याम जाधव(नाईक), जि. बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर पाटील कानकीरड, माजी जि.प अध्यक्षा ज्योतीताई गणेशपुरे, सुनील जामदार, उबाठा चे अनिल राठोड, ता.प्र.रवी पवार, काँग्रेस चे उपाध्यक्ष बलदेव महाराज,डॉ. संजय रोठे, दिलीप रोकडे पाटील,शेतकरी नेते,डॉ.विठ्ठल घाडगे आदींचा समावेश होता…