प्रलंबित आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करून शेतकऱ्यांनी शासकीय मदत प्राप्त करावी
— तहसीलदार मानोरा यांच आवाहन
मानोरा:– तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना माहे डिसेंबर २०२२ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत प्राप्त नुकसान भरपाई ५२६७ शेतकऱ्यांना अद्यापही तांत्रिक त्रुटीमुळे (आधार प्रमाणे करणे न झाल्याने) मिळालेली नसून संबंधित शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण करून उपरोक्त मदत निधीचा (अनुदान) लाभ घेण्याचे आवाहन तालुका आपत्ती निवारण प्राधिकारी तथा तहसीलदार संतोष येवलीकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
मानोरा तालुक्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून वेळोवेळी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी,अवर्षण, दुष्काळ इ. या नैसर्गिक आपत्तीसाठी मदत जाहीर करण्यात येत असते. मार्च ०२३ पासून शेत पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात ही पंचनामा प्रणालीद्वारे थेट मदत निधी जमा करण्याचे धोरण अवलंबिविण्यात आलेले आहे. शासनाकडून घोषित करण्यात आलेली आपत्तीकालीन मदत राशी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांकाचा आधार प्रमाणिकरण (इ- केवायसी) करणे गरजेचे आहे.
सन २०२२-०२३ मधील तालुक्यातील ५२६७ शेतकऱ्यांना सुचित करूनही शेतकऱ्यांचे विशिष्ट आधार क्रमांक झाल्याने प्रमाणित करण्यात न आल्याने शासनाकडून प्राप्त मदत राशी खात्यामध्ये अद्याप जमा होऊ शकलेली नाही. आधार प्रमाणीकरन प्रलंबित असलेल्या संपूर्ण विशिष्ट क्रमांकाची यादी तालुक्यातील सर्व सेतू सुविधा चालक, संग्राम ऑपरेटर यांना पुरविण्यात आलेली असल्याने मदत राशी न मिळालेल्या व आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्याने आपल्या गावातील शेती सुविधाचालक यांच्याकडून आपला विशिष्ट क्रमांक प्राप्त करून तात्काळ सेतू केंद्रावर जाऊन २८ जून पर्यंत आधार प्रमाणे करण पूर्ण केल्यास शासनाकडून प्राप्त मदत राशी बँक खात्यामध्ये प्रशासनाला जमा करता येणार आहे.
शासनाकडून अप्राप्त आपत्तीकालीन मदत राशी मिळण्यासाठी उपरोक्त साईट २८ जून पर्यंत सुरू राहणार असून नंतरही सेट बंद होणार असल्याचे सुद्धा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
आधार प्रमाणीकरनामध्ये काही अडचणी येत असल्यास तहसील कार्यालयाशी संपर्क साधावे तथा ज्या मयत व्यक्तीच्या नावे शेतजमीन असेल त्याच्या वारसांनी वारस नोंदी होण्यासाठी तात्काळ तलाठी यांच्याशी संपर्क साधावा तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती सामायिक आहे अशांनी कोणाच्या खात्यात अनुदान जमा करावी याबाबतचे संमत्ती पत्र तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना देण्याचे आवाहन लेखी निवेदनाद्वारा तहसीलदार मानोरा यांनी शेतकऱ्यांना केले आहे.