फुलसिंग जाधव, सामाजिक कार्यकर्ता छत्रपती संभाजीनगर ( दिनांक २१) गेल्या अनेक वर्षांपासून राजरोशपणे मुळ भटक्या व विमुक्त जातींच्या जाती चोरुन जातीचे खोटे प्रमाणपत्र काढून सवलती लाटल्या जात आहेत. या समाजाने या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेळोवेळी आंदोलने केलेली आहेत. सरकारने या प्रवर्गाच्या आंदोलनाकडे गांभिर्याने पाहून जात चोरुन सवलती लाटणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्याची गरज असतांना सरकारने आजवर बघ्याची भूमिका घेतलेली आहे. मुळ भटक्या व विमुक्त समाजाच्या या गंभीर समस्येकडे सरकारने तात्काळ लक्ष घालून महाबैठक बोलावून जात चोरीसह या प्रवर्गाच्या विविध समस्या सोडवण्यास प्राधान्य द्यावे. सरकारने खऱ्या वंचित समाजाकडे दुर्लक्ष केल्यास या प्रवर्गातील सर्व जातींना रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात जनआंदोलन उभे करावे लागेल. हे जनआंदोलन सरकारला परवणारे नसेल हे सरकारने लक्षात घ्यावे.