गरजवंतांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
*प्रणित मोरे पाटील यांचे कडून युवक युवतींना उपस्थित राहण्याचे आवाहन*
मानोरा :– रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर तालुक्यातील युवक युवतींना उपलब्ध नसल्याने गरजू व कौशल्य तथा शिक्षण प्राप्त युवक युवतींना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रणित मोरे पाटील लोककल्याण विचार मंचच्या वतीने १५ जून रोजी खूपसे सेलिब्रेशन हॉल सोमठाणा रोड मानोरा या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, प्रबोधनकार ख्यातनाम वक्ते व तरुणांचे आवडते विचारवंत ह .भ. प. सोपानदादा कनेरकर यांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभणार असून तरुणांना मोलाचे मार्गदर्शन मिळणार आहे
तालुक्यात रोजगाराच्या संधी स्थानिकांना व तालुक्यातील रोजगार इच्छुकांना उपलब्ध नसल्याने राज्यातील वा परराज्यातील,मोठ्या शहराकडे धाव घेत असल्याचे तालुक्यात दिसत आहे. औद्योगिक शहरांची वाट धरण्याशिवाय दुसरा पर्याय सध्या उपलब्ध नाही. रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन इच्छुकांनी स्थानिक जनसंघर्ष अर्बन बँकेतून नोंदणी अर्ज प्राप्त करण्याचे आवाहन प्रणित मोरे पाटील लोककल्याण विचार मंच मानोराच्या वतीने करण्यात आले आहे.
गरजूंनी या मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन प्रणित मोरे पाटील यांनी केले आहे.
फोटो :– प्रणित मोरे पाटील यांचा