सोहमनाथ विद्यालय आसोला येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न. मानोरा … आज दिनांक 05 जून 2024 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आमच्या श्री सोमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोला खुर्द या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सत्कार समारंभासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश भाऊ भोयर तसेच प्रमुख अतिथी प्रांजली भोयर वैष्णव भोयर उपस्थित होते.दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कॉलेजचा निकाल 99.37% लागलेला असून प्रथम क्रमांक गौरी शामसुंदर हेडा 90.00%द्वितीय क्रमांक मोनिसा मारियानो मान खान 87.67% व तृतीय क्रमांक सानिका सुनील गावंडे 87.00%यांनी पटकावलेला आहे.संस्थेचे सचिव प्राध्यापक गणेश भाऊ भोयर यांच्या शुभहस्ते करण्यात आला या प्रसंगी कॉलेजचे प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक वर्ग व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक मंगेश चौधरी यांनी केले.