दिग्रस येथील मुहम्मद जोहेर नीटमध्ये तालुक्यातून प्रथम
दिग्रस :-
दिग्रस येथील बाबा चांदनगर येथील रहिवासी मुहम्मद जोहेर मुहम्मद फारूक मलिक या विद्यार्थ्याने राष्ट्रीय वैद्यकीय पात्रता व प्रवेश परीक्षेमध्ये {नीट} ७२० पैकी ६८५ गुण प्राप्त करून तालुक्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळविल्याने त्याच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
त्याचे वडील फारूक मलिक आर्णी नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असून त्याचा मोठा भाऊ मुहम्मद उजैरने देखील मागील वर्षी नीटमध्ये ६४६ गुण घेतले होते . तो सद्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय , नागपूर येथे एमबीबीएस प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे .
मुहम्मद जोहेरचे दहावीपर्यंतचे शिक्षण स्थानिक विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल , अकरावी-बारावी वाशीम जिल्ह्यातील धावंडा येथील प्रशिक महाविद्यालय , तर वैद्यकीय शिक्षण नांदेड येथील आयआयबीमधून झाले . तो सुरवातीपासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी होता .
शिक्षक या सामान्य गणल्या जाणाऱ्या कुटुंबातील दुसरा सदस्य डॉक्टर होणार असून त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे . आई-वडील , मोठा भाऊ व सर्व शिक्षकांना तो आपल्या यशाचे श्रेय देत आहे .
फोटो — मुहम्मद जोहेर