वाशिम येथे महाराष्ट्र शासनाचे ग्रंथपालन प्रशिक्षण. वाशिम; महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत असलेल्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय संघ ,वाशिम या जिल्हास्तरीय संस्थेस वाशिम येथे सन 2024 चे ग्रंथपालन प्रशिक्षण सुरू करण्यास शासनाची नुकतीच मान्यता मिळाली असून हे प्रशिक्षण वाशिम जिल्ह्यात एकमेव प्रशिक्षण असून जिल्ह्यात इतर ठिकाणी या प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नाही सदर प्रशिक्षण एप्रिल -मे 2024 या कालावधीमध्ये होणार असून या प्रशिक्षणाची मुख्य परीक्षा जून 2024 च्या प्रथम आठवड्यामध्ये होणार आहे या प्रशिक्षणाच्या प्रवेशाकरिता फक्त एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक असून वयाचे बंधन नाही त्याचप्रमाणे प्रवेशाकरिता कोणत्याही मूळ शैक्षणिक प्रमाणपत्राची आवश्यकता नाही या प्रशिक्षणानंतर शाळा ,कॉलेज , सार्वजनिक ग्रंथालय ,आय टी आय आश्रम शाळा ,न्यायालय ,महामंडळे रेल्वे ,आरोग्य विभाग ,कारागृह शासकीय निमशासकीय कार्यालय ,आकाशवाणी ,प्रसार माध्यमे ,खाजगी कंपन्या , इत्यादी मध्ये ग्रंथपाल ,सहायक ग्रंथपाल ,ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय परिचर , भां डारपाल, अभिलेखापाल यासारख्या पदाकरिता हे प्रशिक्षण पात्र असून प्रशिक्षणा नंतर रोजगाराच्या बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतात सदर प्रशिक्षण वाशिम येथे श्रीमती मालतीबाई सरनाईक विद्यालय बस स्टँड समोर , वाशिम येथे राहणार असून या प्रशिक्षणाचे प्रवेश अर्ज व माहितीपत्रक कार्यालयीन दिवशी ठीक दुपारी बारा ते चार या वेळात प्राप्त स्वतः प्रत्यक्ष हजर राहून प्राप्त केल्या जाऊ शकतात
सदर प्रशिक्षणाकरिता इच्छुक विद्यार्थ्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक ,युतींनी ,कर्मचाऱ्यांनी दुपारी बारा ते चार या वेळात स्वतः प्रत्यक्ष संपर्क करून प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास प्रवेश घेता येईल या प्रशिक्षणाची प्रवेश मर्यादा कमी असून प्रशिक्षणाचा कालावधी सुद्धा कमी असल्याने प्रथम येणाऱ्या प्रथम प्रवेश यानुसार प्रवेश देणे सुरू आहे करिता जिल्ह्यातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार युवक युतींनी कर्मचाऱ्यांनी त्याचप्रमाणे सार्वजनिक ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी शालेय महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी शासकीय नियम शासकीय कार्यालयाचे कर्मचारी ग्रंथ प्रेमी नागरिक,वाचकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकतात असे आवाहन प्रशिक्षण प्रमुख तथा जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह ग्रंथमित्र प्रभाकर घुगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.