युवा उद्योजक पंडित जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड ! मानोरा – तालुक्यातील मौजा भुली येथील युवा उद्योजक पंडित बळीराम जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाशीम जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तसे नियुक्ती पत्र वाशीम येथील पत्रकार भवनात जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे, जेष्ठ नेते पांडुरंग ठाकरे,प्रदेश सरचिटणीस डॉ. श्याम जाधव(नाईक),महिला जिल्हा अध्यक्षा वैशालीताई मेश्राम,यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष बाबारावजी खडसे पाटील यांच्या हस्ते दि.१० मार्च रोजी निवड पत्र देण्यात आले.दरम्यान युवा उद्योजक पंडित जाधव यांच्या निवडीचे वाशीम जिल्ह्यात सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. त्यांच्या जिल्हा पातळीवर झालेल्या निवडीने मानोरा तालुक्यासह जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) बळकट करण्यास मोठी मदत होईल. असा आशावाद सर्वत्र व्यक्त केला जात आहे.