महाज्योतीच्या जागेत वाढ!
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा!
नामा बंजारा
महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने देण्यात येणाऱ्या (महाज्योती) स्पर्धा परीक्षेच्या प्रशिक्षणाचां लाभ विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महज्योतीमार्फत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. परंतु अपुऱ्या जागेमुळे अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेता येत नव्हते. राज्यातील ओबीसी, विमुक्त भटके व विशेष मागासप्रवर्ग असा मोठा प्रवर्ग महाज्योतीच्या कक्षेत येतो. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जागा वाढविण्यात याव्यात यासाठी वारंवार पाठपुरा केल्या जात होता. बहुजन कल्याण मंत्री मा. अतुल सावे यांच्याकडे सुध्दा वारंवार पाठपुरावा केल्या जात होता. मुक्या व बहीऱ्या झालेल्या शासनाचे डोळे उघडण्यासाठी हिवाळी अधिवेशनात जागर आंदोलन करण्यात आले. ग्रामविकास मंत्री श्री महाजन यांनी अखिल भारतीय तांडा सुधार समितीच्या शिष्टमंडळाला महाज्योतीच्या जागावाढीबाबत संचालक मंडळासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. नुकतेच शासनाने या जागा वाढविण्यास अनुमती दिली असून तूर्तास २,२५० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचे अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे महासचिव नामा बंजारा यांनी स्वागत केले असून आभार मानले आहे.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था कार्यरत असून गाव, वाडी वस्तीतील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन नामा बंजारा यांनी केले आहे.