आ.राजेंद्र पाटणी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण
तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती
मानोरा –जिल्हयाचे विकासाभिमुख नेतृत्व कारंजा – मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांना दि. २७ फेब्रुवारीला माहेश्वरी भवन येथे सर्वपक्षाच्यावतीने शोकसभेत सामुहिक श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या जीवन चारित्र्यावर नेते , पुढाऱ्यांनी प्रकाश टाकून उजाळा दिला.
सुरुवातीला पं. स. कार्यालयापासून ते माहेश्वरी भवन पर्यंत अस्थि कलश यात्रा काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी त्यांचे शेकडो चाहत्यांनी अस्थि कलशाचे दर्शन घेऊन अश्रूनयनांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश ओबीसी सेलचे सरचिटणीस सुरेश गावंडे म्हणाले की, मृदू स्वभावाने सर्वांना आपलेसे करून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आ.पाटणी यांची ओळख होती. यांनी कार्यकर्त्याला बळ देण्याचे काम त्यांनी करत इतर पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे सुध्दा काम केले आहे. असे बोलत त्यांच्या भेटीतील अनेक प्रसंग सांगितले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्याम बढे, बाजार समितीचे सभापती डॉ. रोठे, काँग्रेसचे वाशीम जिल्हा प्रभारी देवानंद पवार, काँग्रेसचे इफ्तेखार पटेल, रा. का.चे गुल्हाने, वंचितचे मनोहर राठोड, भाजपा तालुकाध्यक्ष ठाकुरसिंग चव्हाण, पत्रकार वसंत राठोड, अशोक चव्हाण, पंकजपाल महाराज, निळकंठ बोरकर, मधुकर राठोड, रमेश नागापुरे, विजय पवार, योगेश राठोड, गोरसेनेचे गोपाल चव्हाण, राजु काळे, गोपाल शर्मा, डॉ.ललित हेडा, रोनक हेडा, आशिष पाटील, योगेश राठोड आदींनी स्व.आ. पाटणी यांच्या आठवणीला उजाळा दिला.
तरी यावेळी आयोजीत श्रद्धांजली कार्यक्रमाला स्व. पाटणी यांचे चिरंजीव ज्ञायक पाटणी, भाजपाचे पदाधिकारी उमेश ठाकरे, महादेवराव ठाकरे , प्रकाश राठोड, निळकंठ पाटील, विजय पाटील, मिलिंद देशमुख , प्रकाश जाधव, परेश राठोड, संजय हेडा, मुकेश चव्हाण, डॉ. हरिष नवहाल, स्विय सहाय्यक दिनेश उपाध्याय, सुभाष सुरोशे, सचिन घोडे, प्रविण धोटे, राजु देशमुख, श्याम राठोड, गणेश जाधव, आनंद देशमुख , प्रभाकर माहोरकर, भाजपा सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.