कमला रहेजा विद्यानिधि इन्स्टिट्यूटच्या प्रतिष्ठित “उद्धरण” पुरस्काराने नील बंग सन्मानित
कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड रिसर्च, मुंबई विद्यापीठाचा प्रतिष्ठित प्रशस्तिपत्र उद्धरण पुरस्कार-2023(Citation) हा स्थानिक दिग्रस येथील नील संजय बंग याला मिळाला.
दिग्रास – आर्किटेक्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कमला रहेजा विद्यानिधी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड रिसर्च,मुंबई हे महाविद्यालय अत्यंत प्रतिष्ठित व दर्जेदार मानले जाते.याच महाविद्यालयात मागील चार वर्षापासून नील बंग अनेक स्पर्धात्मक दर्जेदार व पर्यावरण पूरक उपक्रम तसेच विविध प्रतिकृतीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचा.त्याच्या चार वर्षांतील अश्या अनेक उपक्रम व प्रतिकृतीच्या अनुषंगाने त्याला महाविद्यालयाचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2023 चा उद्धरण पुरस्कार देण्यात आला.त्याच्या यशाचे श्रेय तो आपले आईवडील डॉ.संजय बंग,डॉ.रश्मी बंग ,आजी आजोबा सौ.राधादेवी बंग,विजयकुमार बंग तसेच आपल्या प्राचार्य, प्राध्यापकांना देतो.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.