बारावी परीक्षेच्या अनुषंगाने आयोजित पालक सभा संपन्न
सोमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रम
मानोरा:–तालुक्यातील विविध कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या कला,विज्ञान व वाणिज्य शाखेच्या शाळेचे बोर्डाच्या परीक्षा २१ तारखेपासून सुरू झाल्या असून विद्यार्थ्यांनी भयमुक्त व कॉपी विरहित परीक्षा द्यावी यासाठी पालक सभेचे आयोजन सोमनाथ विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आसोला येथे आयोजन करण्यात आले होते.
इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा व्यवस्थित पार पडणार की नाही वर्षभर केलेल्या अभ्यास वेळेवर आठवणार की नाही आधी बाबींमुळे तणाव येतो.
पालकांनी आपल्या पाल्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या मनावर आलेला तणाव दूर करावा. आणि परीक्षा देताना न घाबरता सहजपणे लेखी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी आपल्या पाल्यांची मानसिकता तयार करण्याचे आवाहन पालक सभेचे अध्यक्ष स्थान भूषविणारे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य जी एल भोयर यांनी केले.
तालुक्यातील जिल्हा परिषद वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर आपल्या पाल्यांना सोडल्यानंतर कुठल्याही पालकाने परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये न थांबण्याच्या सूचना सुद्धा यावेळी भोयर यांनी करून शिक्षण प्रशासन आणि गृह विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. पालक सभेला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.