श्रीमती मंजुषा आडे राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रीय महिला आयोगाच्या राज्याध्यक्षां कडून सन्मान
मानोरा–तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत नेमणुकीला असलेल्या महिला ग्रामसेवक मंजुषा जनार्धन राठोड (आडे) यांचा नुकताच पुणे येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या महाराष्ट्र अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार २०२४ देऊन सन्मान करण्यात आला.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक गंजपेठ पुणे येथे राजश्री शाहू प्रतिष्ठान तर्फे आपल्या कार्यकाळात केलेली विविध सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक कार्य तसेच गावाच्या विकासाला दिलेल्या योगदानाची दखल घेऊन केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी राजश्री शाहू आदर्श ग्रामसेवक पुरस्कार राजश्री शाहू प्रतिष्ठान,दक्ष मराठी पत्रकार संघ व जागृत शोध वृत्तपत्र यांच्या सहयोगाने दिले जाते.
आदर्श ग्रामसेवकांचा सन्मान व्हावा यासाठी भगवान श्रीमंदिलकर आयोजक तथा संस्थापक अध्यक्ष राजश्री शाहू प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केल्या जाते.
महिला ग्रामसेवक श्रीमती मंजुषा राठोड (आडे) यांना मिळालेल्या पुरस्काराने व झालेल्या सन्मानाने तालुक्यात नेमणुकीला असलेल्या ग्रामसेवकांकडून शासनाच्या विविध कल्याणकारी योजना निष्पक्ष व प्रभावीपणे रावीण्यास प्रेरणा मिळणार असल्याच्या चर्चा तालुक्यातील नागरिकांमध्ये होत आहे.