मुलांनो, देशाचा चांगला नागरीक व्हा
- अनुज तारे
चाचा नेहरू बाल महोत्सवाचे थाटात उद्घाटन
वाशिम,दि.७ (जिमाका) : मुलांनो देशाचा चांगला नागरीक व्हा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी बाल महोत्सवाच्या उद्घाटनावेळी केले.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयअंतर्गत व जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम यांच्या सहयोगाने ७ ते ९ दरम्यान चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल महोत्सवाचे जिल्हा पोलीस
अधीक्षक अनुज तारे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रियांका हरिश्चंद्र गवळी, सहायक लेखा अधिकारी आलिशा भगत,विधी सल्लागार बालासाहेब सूर्यवंशी, मारोती खंडारे, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सचिन खरात यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी मुलांनी देशाचा चांगला नागरीक बनावा, चांगले कार्य करावे, असे मार्गदर्शनातून सांगितले.
शाहू भगत यांनी ही मुलांना शैक्षणिक विकास साधावा तसेच खेळामध्ये आपल्या देशाचे नाव उज्वल करावे, असे आव्हान केले.
सचिन खरात सर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
दुसऱ्या सत्रामध्ये कब्बडी,धावणे, गोळाफेक ह्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियांका गवळी यांनी केले. प्रास्ताविक मध्ये मुलांनी सुप्त गुणांना वाव द्यावा, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार भगवान ढोले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी मानले.
कार्यक्रमासाठी अधिकारी कर्मचारी शाळेचे शिक्षक, बालगृहाचे अधिक्षक यांनी विशेष सहकार्य केले.
०००